महाअंनिस च्या चमत्कार प्रशिक्षण शिबीराला प्रचंड प्रतिसाद.

महाअंनिस च्या चमत्कार प्रशिक्षण शिबीराला प्रचंड प्रतिसाद.

महाअंनिस च्या चमत्कार प्रशिक्षण शिबीराला प्रचंड प्रतिसाद.

✍विजेंद्र मेश्राम✍
गोंदिया जिल्हा प्रतिनिधी
8975019967

गोंदिया : – राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 148 व्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक न्याय दिवसानिमित्त महा.अंधश्रद्धा निर्मूलन समिती उत्तर नागपूर शाखा व जिल्हा कार्यकारिणी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने , प्रा.एन.डी.पाटील वैज्ञानिक जाणिवा अभियानांतर्गत ,एक दिवसीय चमत्कार प्रशिक्षण शिबीराचे आयोजन सुगत बुद्धविहार सुगतनगर नागपूर येथे आयोजित केले होते. उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, सामाजिक न्याय विभाग नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शिबिराचे उद्घाटन मंजुषा मेश्राम मित्रजन पतसंस्था नागपूर यांनी केले. प्रशिक्षक म्हणून राजेंद्र कोळी सर, राज्य सदस्य ठाणे कल्याण मुंबई; अशोक वानखेडे सर , कार्याध्यक्ष महाअनिस मुंबई व स्वप्ननील शिरसाट ठाणे हे लाभले होते.
या शिबिरात बुवाबाजी ,चमत्काराचे प्रयोग सादरीकरण यात प्रामुख्याने पाण्याने दिवा जाळणे,जळता कापूर तोंडात घेणे, कापलेली सुतळी जोडणे, कवठेमहांकाळ मानवी कवटीला मंत्राने खाली वर करणे, डोळ्यावर काळी पट्टी बांधून वस्तू ओळखणे, पुस्तक वाचणे, ई.चमत्काराचे प्रयोग करुन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकले.प्रशिक्षणात अधुन मधुन खंजेरीवर चळवळीचे गीत सादर करून स्वप्नील शीरसाठ यांनी प्रशिक्षणार्थींना अक्षरशा खीळवुन ठेवत रंगत आणली.
सुरवातीला आनंद मेश्राम यांनी संविधानाची उद्धेशिका वाचन केल्यानंतर मुंबईचे राजेंद्र कोळी व अशोक वानखेडे यांनी प्रत्येक वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय तसेच मन व मनाचे आजार या विषयावर विस्तृत विश्लेषण करुन उदाहरणासहीत पटवून दिलं.
भोजनानंतर च्या दुसऱ्या सत्रात प्रशिक्षणार्थींना चमत्काराचे प्रात्यक्षिकें करायला लावले व त्यामागील कारणमिमांशा व वैज्ञानिक दृष्टिकोन समजाऊन सांगितले.विशेष म्हणजे सहभागी प्रशिक्षणार्थींना जुलै महिन्यापासून सदर चमत्काराचे प्रयोग शाळांमध्ये विद्यार्थ्यांसमोर प्रस्तुत करणे आहे.
या प्रसंगी चमत्कार सादरीकरणासाठी लागणाऱ्या साहित्याची किट, डॉ.सिद्धार्थ गायकवाड, व रामभाऊ डोंगरे, विजया श्रीखंडे यांच्या हस्ते, चंद्रपूर, ,गोंदिया, गडचिरोली, नागपूर , या चार जिल्ह्यातील शाखांना वाटप करण्यात आले .
आपल्या समारोपीय भाषणात उपायुक्त डॉ.गायकवाड म्हणाले की शासनाने 2013 ला जादुटोणा विरोधी कायदे केले . आणि तेव्हा पासून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती निस्वार्थपणे जादूटोणा विरोधी कायदा, व अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम तळागळातील जनतेपर्यंत पोहचवीत आहे . तरीही समाजात अजुनही खूप अंधश्रद्धा पसरली आहे. महा.अंनिस चे हे कार्यकर्ते जनप्रबोधन यात्रा व विविध उपक्रम राबवून प्रत्यक्ष लोकांपर्यंत जाऊन अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करतात,ते कौतुकास्पद आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्याध्यक्ष चित्तरंजन चौरे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा.पुष्पा घोडके यांनी व्यक्त केले.
या शिबिराला चंद्रपूर शाखेतर्फे भीमलाल साव,गंगा हस्ते , डॉ.मेश्राम मॅडम, किशोर तेलतुंबडे, कृष्ण दास गजभिये, कैलास बांबोळकर ,प्रशांत बांबोरे ,संग्राम ढेपेकर ,विजय जांभुळकर , भद्रावती शाखेच्या वतीने शारदाताई खोब्रागडे,लता टिपले, अनिता भजभूजे, रविंद्र वानखेडे, बल्लारशाह वरुन छायाताई सोनटक्के, गोंदिया वरुन के. पी.ऊके, डॉ.मनोज बनसोड, गडचिरोली वरुन डॉ.चंद्रप्रकाश डोंगरवार, सुनंदा आतला,मुल शाखा जी चंद्रपूर वरुन विनायक रामटेके,नागभिड वरुन पत्रकार आनंद मेश्राम, अरुण पेंदाम , इंदुमती उमरे, तसेच नागपूर शहरातील दक्षिण शाखा , पश्चिम शाखा हिंगणा व उत्तर नागपूर शाखेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते असे एकुण 72 प्रशिक्षणार्थीं उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवानंद बडगे कार्याध्यक्ष उत्तर नागपूर, आनंदमामा मेश्राम, चंद्रशेखर मेश्राम, प्रिया गजभिये, स्वेता पाटील, चंदाबाई मोटघरे,वंदना टेंभुर्ने, वर्षा शहारे, सर्व उत्तर नागपूर शाखा व ईतर कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न केले.