स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत राष्ट्रध्वजाभिमान – जिल्हाधिकारी
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
✍अजय उत्तम पडघान✍
7350050548
वाशीम जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पुर्ण होत आहे. यानिमित्ताने नागरीकांच्या मनामध्ये स्वातंत्र्य लढयाच्या स्मृती तेवत राहाव्या. या लढ्यातील क्रांतीकारक तसेच अज्ञात नायकांच्या घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे तसेच प्रखर देशभक्तीची भावना कायमस्वरुपी जनमानसात रहावी या उद्देशाने आपल्या वैभवशाली इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत उपक्रम ध्वजसंहितेचे पालन करुन प्रभावीपणे राबविण्यात यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले. आहे आयोजित आढावा सभेत षण्मुगराजन बोलत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, उपवनसंरक्षक मीणा, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनीता आंबरे, जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता, कौशल्य विकास व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज, शिक्षणाधिकारी रमेश तांगडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विजय काळबांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, मानव विकास मिशनचे जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपूरे व प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आलोक अग्रहरी यांची प्रमुख उपस्थिती होती✍