महाराष्ट्र राजकारणात पुढे नक्की काय_होईल…?

महाराष्ट्र राजकारणात पुढे नक्की काय_होईल…?

महाराष्ट्र राजकारणात पुढे नक्की काय_होईल...?

✍अजित दुराफे ✍
मुंबई महानगर प्रतिनिधी
77180 95197

मुंबई : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ,बंडखोर आमदार शिवसेना सोडणार नाहीत.एकनाथ शिंदे गटाने शिवसेना न सोडता मविआ सरकारचा पाठींबा काढून घेतल्यानंतर फ्लोअर टेस्ट मध्ये मविआ सरकार कोसळेल. अजय चौधरी व सुनील प्रभू यांची निवड सुप्रीम कोर्टात बेकायदेशीर ठरेल. एकनाथ शिंदेच शिवसेना विधीमंडळ पक्षाचे नेते राहतील, त्याच वेळी उद्धव ठाकरे मूळ शिवसेना पक्षाचे प्रमुख राहतील. शिवसेना विधी मंडळ पक्ष भाजपला पाठींबा देत सरकारमध्ये सामील होत सरकार स्थापन करेल. लक्षात ठेवा मूळ शिवसेना पक्षावर हुकूमत उद्धव ठाकरे यांची असेल तर शिवसेना विधीमंडळ पक्षावर हुकूमत एकनाथ शिंदे यांची असेल अशा तऱ्हेने भाजपा आणि शिवसेना विधीमंडळ पक्ष अडीज वर्षे सरकार चालवेल.

निवडणुका लागल्यानंतर कोणत्या पक्षात विलीन व्हायचे की पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे जायचे हा त्यावेळेचा प्रश्न असेल. (असे आज सुत्रांशी चर्चा करतेवेळी आतल्या गोटातून समजले आहे)

आता शिंदे विधीमंडळ गटाने सध्या कोणत्याही पक्षात विलीन न होता भाजपा-शिवसेना असे सरकार स्थापन होवू शकते. विलीनीकरणाची चर्चा ही फक्त प्रहार, मनसे यांना टुकटुक करण्यापुरती आहे.
अशा तऱ्हेने मनसेची, प्रहारची पण वट वाढेल. मिळणार नव्हती ती सत्ता अडीच वर्षे भोगता आली म्हणून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे पण जास्त नाराज असणार नाहीत. भाजपाला महाराष्ट्रात आपले सरकार आले म्हणून दंड थोपटून घेता येतील. विधीमंडळ शिवसेनेला आपण एवढा उटारेटा करुन सन्मानाने सत्तेत सामील झालो यात समाधान वाटेल. शिवाय ईडीची भिती नसेल म्हणून सुरक्षितताही वाटेल.

संजय राऊत आणि आदित्य ठाकरे हे

” निवडणुका लागू द्या, मग तुम्ही कसे निवडून येता ते आम्ही पाहतो” अशा अडीच वर्षे वल्गना करत राहतील.

जनता मात्र मूळ शिवसेना कोणती आणि सत्तेतली शिवसेना कोणती या कन्फ्युजन मध्येच राहील.

दोन हजार चोवीस पर्यंत हा गोंधळ असाच राहील. त्यानंतर काय होईल? हे देवांचा राजा ‘ देवेंद्र ‘ आणि देवेंद्राचा राजा ‘ नरेंद्र ‘ ही देवमाणूसमंडळी काय ठरवतील यावर अवलंबून असेल.