मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वर आपल्या ताब्यातील प्याजो रिक्षा टेम्पो चा ताबा सुटल्याने अपघात…..
✍️सचिन पवार ✍️
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞
माणगांव :-मुंबई गोवा राष्ट्रीय ६६ महामार्गावरील मौजे कोशिबळे गावच्या हद्दीत एम एच ०६ बी व्ही ४९३९ प्याजो रिक्षा टेम्पो हा अतिवेगाने चालवीत वळणावर आला असता आपल्या ताब्यातील रिक्षा टेम्पो चा ताबा सुटल्याने रोडच्या डाव्या बाजूला खाली जाऊन समोर असलेल्या झाडाला ठोकर मारून हा अपघात झाल्याची घटना दि.२७ जून रोजी दुपारी १.३० च्या दरम्यान घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असं की आरोपी इसम निलेश गंगाराम वाढवलं वय वर्ष ३५ रा. चिले खांब ता. रोहा हा आपल्या ताब्यातील रिक्षा प्याजो ही मुबंई गोवा महामार्गवरील मौजे कोशिबळे गावच्या हद्दीत अतिवेगाने हायगायीने बेकायदेशीर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवीत असताना प्याजो रिक्षा टेम्पो वरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असून फिर्यादी नथुराम यशवंत महाडीक वय वर्ष ४१ रा. चिल्ले खांब ता. रोहा यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे व चालक निलेश गंगाराम वाढवलं यांला लहान मोठया स्वरूपात दुखापत झाली आहे.या घटनेचा तपास माणगांव पोलीस ठाण्यात आरोपी चालक निलेश वाढवलं यांच्या विरोधात कॉ गु रजि नं २१४/२०२३ भा. द वि सं कलम २७९,३३७,३३८ मो. वा. कां. कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनखाली पुढील तपास पोलीस हवालदार संमेल, पोलीस हवालदार पवार हे करीत आहेत.