आर टी ओ पनवेल कडून पावसाळ्याच्या सुवातीसच वृक्षारोपण

आर टी ओ पनवेल कडून पावसाळ्याच्या सुवातीसच वृक्षारोपण

आर टी ओ पनवेल कडून पावसाळ्याच्या सुवातीसच वृक्षारोपण

आर टी ओ पनवेल कडून पावसाळ्याच्या सुवातीसच वृक्षारोपण

✍️संतोष आमले ✍️
पनवेल तालुका प्रतिनिधी
📱9220403509📱

पनवेल : – पावसाळाच्या सुरवातीचे निमित्त साधुन आर टी ओ कार्यालय पनवेल यांनी तळोजा येथील ब्रेकटेस्टिंग ट्रॅक (वाहन तपासणी पथ ) येथील अधिकाऱ्यांनी प्रादेशिक परिवाहन अधिकारी मा.श्री अनिल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 40 झाडांचे आज रोजी तळोजा ट्रॅकवर वृक्षारोपण करण्यात आले, यामध्ये वर्षानुवर्षे सावली देणारे, फळे देणारी, जमिनीची होणारी धुप रोखुन ठेवणारी आणि औषधं युक्त असणारे अश्या वड, पिंपळ, आंबा, चिंच, कडुलिंबू आवळा, नारळ, बोर इत्यादी झाडांचा समावेश केला आहे.
या प्रसंगी प्रमुख अतिथी श्री. अनिलजी पाटील साहेब बोलत असताना सर्वात आधी तुकाराम महाराजांच्या ओवीने केली ती म्हणजे “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” आणि सर्व सहकार्याचे कैतुक आणि अभिनंदन करत बोलले कि,मीं एक शेतकरी कुटूंबात जन्म घेतलेला असुन मला सुद्धा शेती आणि वृक्ष संवर्धनाचे महत्व माहित असुन त्याची जाण माझ्याही सहकाऱ्यामध्ये असल्याचे मला नेहमीच जाणवत आहे नेहमीच कुठे बाहेर ना जाता आपल्याच घरातुन सुरवात करावी हे डोळ्या समोर उदाहरण ठेवत हे सर्वजण काम करतात मग ते वाहन चालकांचे डोळे तपासणी असो, त्यांच आरोग्य तपासणी असो, अपघात काळात मदत कशी आणि कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन करणे, आणि विशेष म्हणजे स्वछता, आपला परिसर कसा स्वच्छ रहावा या कडे जाणीव पुर्वक लक्ष या सर्वांचे असते,असे अनेक सुत्य उपक्रम आपण राबवत असता या करता आपले सर्वांचे मीं मनात पासुन अभिनंदन नंदन करतो आहे, तसेच हिमालिया एकझोटीका नर्सरी अँड लँडस्केपरच्या पुजा तिवारी यांचे आम्हाला विशेष सहकार्य लाभले त्यांचे सुद्धा मान पूर्वक आभार मानले.
या प्रसंगी सहाय्यक प्रादेशिक परिवाहन अधीकारी श्री. निलेश धोटे,श्री.विधाते, मोटार वाहन निरीक्षक संदीप कोतकर, प्रवीणकुमार बाबर,योगेंद्रसिहं शितोळे देशमुख, विकास माळवे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक विशाल सुपेकर, शिंदे, पिरती पवार, कोकण रिक्षा टॅक्सीचे उपाध्यक्ष बाळा झोडगे आदी उपस्थित होते.