साईगुरूल इंग्लिश मिडियम स्कूलमधे पालखी व बालदिंडी सोहळा उत्सवात साजरा

साईगुरूल इंग्लिश मिडियम स्कूलमधे पालखी व बालदिंडी सोहळा उत्सवात साजरा

साईगुरूल इंग्लिश मिडियम स्कूलमधे पालखी व बालदिंडी सोहळा उत्सवात साजरा

साईगुरूल इंग्लिश मिडियम स्कूलमधे पालखी व बालदिंडी सोहळा उत्सवात साजरा

संजय महाजन
शिर्डी तालुका प्रतिनिधी
मो. नं .8308964268

शिर्डी : – शिर्डी येथील साईगुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूलमधे आषाढी एकादशी निमित्त शाळा ते साईबाबांच्या मंदिरापर्यंत विठ्ठल नामाच्या जयघोषात आणि पावलीसह टाळांच्या गजरात विदयार्थ्यांची दिंडी काढण्यात आली. विठ्ठल नामाच्या गजराने वातावरण अगदी भक्तीमय झाले होते. साईगुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीने संस्थेचे चेअरमन मा. श्री तानाजी वामनराव गोंदकर आणि प्राचार्या सौ मंगला कु-हे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या पालखीचे आयोजन करण्यात आले होते प्रथम पालखीची पूजा आणि आरती मा. संभाजी रामचंद्र पवार साहेब (शिक्षण विभाग विस्तार अधिकारी पंचायत समिती राहाता) आणि त्यांच्या सौभाग्यवती जयश्री संभाजी पवार यांच्या हस्ते करण्यात आली तसेच माननीय शेळके सर यांनी सुद्धा आपली उपस्थिती या सोहळ्यासाठी दिली होती यानंतर टाळ मृदुंगाच्या निनादात विठ्ठल नामाचा जयघोष करत फुलांनी सजवलेली पालखी घेवून वारकऱ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी शाळा ते साई मंदिरापर्यंत दिंडी काढण्यात आली अग्रभागी भगवे ध्वज, पालखी आणि त्यानंतर विठ्ठल रुख्मणीच्या वेशभूषेतील चिमुकले बाळगोपाळ आणि उर्वरीत विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषेत दिंडीत दंग झाले होते, भक्तिमय अशा वातावरणात साईबाबांच्या पावन अशा प्रांगणात, साईगुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी खूप छान अशी पावली, रिंगण सोहळा सादर केला हे सर्व वातावरण अगदी मन भारावून टाकणारे होते आणि खरोखरच शिर्डी माझे पंढरपूर याची प्रचीती येत होती, बालगोपालांच्या या अनोख्या अशा सोहळ्याचे साईभक्तांनी आणि पालकांनी मनोभावे कौतुक केले एवढेच नाही तर या सोहळ्याची सांगता करण्यासाठी वरुणराजानेही आपली हजेरी लावली. दिंडी सोहळा यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक शर्मा मॅडम, आगलावे मॅम, काळे मॅम कुमावत मँडम, निकम मॅडम, चैताली गायकवाड मॅडम, सपकाळ मॅडम मेशरामकर मॅडम, गिधाड मॅडम, कांबळे मॅडम कातोरे मॅडम आणि यश कोते सर तसेच वाघ मावशी हतांगळे मावशी, नवगीरे मावशी, जेजूरकर मावशी मच्छिंद्र शेलार मामा, अशोक मोरे मामा यांनी मोलाचे सहकार्य केले.