आरोग्य सहाय्यिका तनुजा मुळे यांचा सेवानिवृत्तीचा निरोप समारंभ सोहळा.

आरोग्य सहाय्यिका तनुजा मुळे यांचा सेवानिवृत्तीचा निरोप समारंभ सोहळा.

आरोग्य सहाय्यिका तनुजा मुळे यांचा सेवानिवृत्तीचा निरोप समारंभ सोहळा.

किशोर पितळे-तळा तालुका प्रतिनीधी९०२८५५८५२९

तळा :- तळा प्राथमिक आरोग्य केंद्र तळाचे वतीने आरोग्य सहाय्यिका श्रीम.तनुजा पु.मुळे यांचा नियत कालानुसार सेवानिवृत्ती समारंभ प्रा.शाळा सभागृहात २८जून२४ रोजी आयोजीत केला होता या प्रसंगी व्यासपिठावर तालुका आरोग्य अधिकारी,वंदन पाटील,वैद्यकीय अधीकारी,गजेंद्र मोघे,डाॅ.होमसांगडे, नगराध्यक्षा माधुरी घोलप उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे,डाॅ चंद्रकांत विचारे, सत्कारमुर्ती तनुजा मुळे,भद्रेश पटेल श्रीराम कजबजे,महेद्र कजबजे, महादेव गोळे,पुजा मुळे(पतंगे )श्री.नांदगांवकर उपस्थीत होते.यावेळी आरोग्य विभागा कडून यथोचीत सन्मान शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व भेट वस्तू देवून सन्मानीत केले तसेच स्नेही,नातेवाईक,आरोग्य सेविका सहकारी यांनी सन्मान केला. आरोग्य सेवीका ते आरोग्य सहाय्यिका असा प्रवास झाला ३९ वर्षे सेवा केली.आरोग्य सेवा हिच ईश्वर सेवा चा वसा घेऊन तळा येथे जवळ पास २८ वर्षे सेवा केली बाकी सेवा माणगांव मुरूड तालुक्यात झाली.या कालखंडात आरोग्य खात्यातील सेवा ईश्वर सेवा समजुन १९८५ साली आरोग्य सेवेत सुरू झाले.आशा सेवीका,आरोग्य सेवक,सेविका, कंपाऊडर,जी एन् एम् तसेच अधीकारी यांच्याशी सन्माने वागून आपल्या कामाला पहीला प्राधान्य देत असत.आलेल्या पेशंट जवळ विशेषत:गरोदर महीलांची काळजीपुर्वक चौकशी डिलिव्हरी, स्तनदा मातांनी घ्यावयाची काळजी, बालकांना आवश्यक असणारी पोषक आहार,साथीचे आजार,लशीकरण तसेच शासनाचे आरोग्य विषयी चे उपक्रम तळागाळापर्यंत पोहोचवून लाभ देत असत. समाजापेक्षा आरोग्य सेवा हिच ईश्वरसेवा समजून घेतलेला वसा आरोग्य खात्यात आपले नांव राखले आज सेवानिवृतीचा निरोप समारंभ होत असताना अनेक सहकारी,स्नैही, आशा सेवीका,डाॅक्टरांचे देखील डोळ्याकडा पाणावल्या.अनेकांनी मनोगत व्यक्त करुनपुढीलआयुष्यासाठी शुभेच्छा देतानाअनेकजण भावनाविवष झाले होते. पती पुरुषोत्तम मुळे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि तालुका डोंगराळ दुर्गम असताना वाहनांची मोठी अडचणीची समस्या होती.गावोगावी जावून लशीकरण करणे शासनाच्या योजना तळा गळ्यात पोहोचवणे मोठी कसरत होती रिपोर्टीग करणे.साथ आली तर डोस देणे अशी सेवा घर सांभाळून करणे. दोन मुलीचे बालपण शिक्षणही सारी तारेवरची कसरत होती.तरी देखील आरोग्य सेवेत खंड पडू दिला नाही ती ईश्वर सेवा समजत होती ती ३९वर्षे साभांळली.मी लेखक सामाजीक कामाचा व्याप, पत्रकारिता,खाजगी नोकरी याकडे व्यस्त असताना तीने मोठी साथ दीली ती तुम्ही समाजाची सेवा करा. मी आरोग्य सेवेकडे दुर्लक्ष करणार नाही ती माझी सेवा आहे.आज सेवा निवृत्ती समारंभ सोहळा ‘न भूतो न भविष्यती’ असा आयोजीतकरुन सौ.तनुजा ने आजवर केलेल्याकार्याची पोहच पावती मिळाली आहे.या कौटुबिक जिव्हाळ्या चा आरोग्य विभागाने केलेला पहिलाच सेवा निवृत्ती समारंभ हा अतीशय चांगल्या पध्दतीने आयोजन केले त्याचा आभारी आहे.यावेळी सत्कार मुर्ती तनुजा मुळे सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या कि आपण जे स्विकारले ते केलेच पाहीजे अनंत अडचणी येत असतात पण मी आरोग्य सेवेचा घेतलेला वसा समर्थ पणे पुर्ण करु शकले आजवर केलेल्या सेवेचा निरोप घेताना अंत:करणं भरुन येते.सेवेत सहकारीवर्ग,डाॅक्टर यांनी केलेल्या सहकार्याची ऋणी आहे. सेवा निवृत्ती समारंभ हा अतीशय चांगल्या पध्दतीने आयोजन केले त्याचा आभारी आहे.या समारंभाला आशा सेविका,आरोग्य कर्मचारी सहकारी,नातेवाईक,स्नेही, उपस्थीत होते कार्यक्रमाचे सुत्र संचालन सौ. मितल मुळे (वावेकर) यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here