५ जुलैपासून शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम सुरू शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी म्हसळा शिक्षण विभागाकडून प्रयत्न

५ जुलैपासून शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम सुरू

शिक्षण प्रवाहात
आणण्यासाठी म्हसळा शिक्षण विभागाकडून प्रयत्न

५ जुलैपासून शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम सुरू शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी म्हसळा शिक्षण विभागाकडून प्रयत्न

✍️संतोष उध्दरकर✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१.📞

म्हसळा -: दिनांक ५ जुलै २०२४ ते २० जुलै २०२४ या कालावधीत म्हसळा तालुक्यात शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी म्हसळा शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांची विशेष शोध मोहीम करण्यात येणार आहे.
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क अधिनियम २००९राज्यात दिनांक १ एप्रिल २०१० रोजी लागू करण्यात आलेला आहे या कायद्यानुसार वय वर्ष सहा ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकास मोफत व सक्तीचे शिक्षण घेण्याचा हक्क प्राप्त झाला आहे त्यामुळे सदर बालकांना दर्जेदार शिक्षण मिळण्याचा हक्क प्राप्त आहे शाळेत कधीच दाखल न झालेली बालके तसेच शाळेत न जाणारे बालके यांनी शाळेत वेळ घेतल्या नाही व्ही वन किंवा बालकांनी शाळेत प्रवेश घेऊन प्राथमिक शिक्षण पूर्ण केले नसेल अशा ०६ ते १४ वयोगटातील एक महिन्यापेक्षा अधिक काळ सातत्याने अनुपस्थित राहत असतील अशा बालकांना शाळाबाह्य बालक म्हणावे अशी व्याख्या शिक्षण हक्क अधिनियम नुसार केली आहे
म्हसळा तालुक्यात प्राथमिक समग्र शिक्षा कार्यक्रमाची तसेच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत ज्ञानरचनावादी शाळा, कृतीयुक्त अध्ययन पद्धती, डिजिटल शाळा मोफत पाठ्यपुस्तक विविध शिष्यवृत्ती परीक्षा तयारी, अशा प्रभावी उपक्रमाचे अंमलबजावणी अनुभवी व तज्ञ शिक्षक मार्फत सुरू आहे. परंतु शासनाच्या अनेक योजना सुरू असतानाही अद्याप काही बालके शाळाबाह्य असल्याचे निदर्शनात आले आहे. अशा बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी म्हसळा शिक्षण विभागाकडून दिनांक ०५ जुलै २०२४ ते २० जुलै २०२४ या कालावधी हे सर्वेक्षण होणार आहे.
अशी आहे शोध मोहीम

*मोहिमेनुसार घरोघरी जाऊन शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्या व्यतिरिक्त बस स्थानक रेल्वे स्थानक बाजारपेठ वीटभट्टी दगडखाणी स्थलांतर कुटुंबे, तालुक्यातील सर्व खेडी, गाव, वाडी, वस्त्या, तांडे- पाडे आधी ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांच्या नोंदी करण्यात स्पष्ट करण्यात आले आहे.*
*या कालावधीत नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन शिक्षण विभागाचे गटशिक्षण अधिकारी संतोष दौंड, विस्तार अधिकारी अरविंद मोरे व गटसमयव्यक कौचाली यांनी केले आहे.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here