पोस्टाच्या कोषागारामधून 3.75 लाखाची चोरी

पोस्टाच्या कोषागारामधून 3.75 लाखाची चोरी

पोस्टाच्या कोषागारामधून 3.75 लाखाची चोरी

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

राजुरा : 28 जून
येथील किसान वॉर्ड परिसरातील मुख्य पोस्ट कार्यालयाच्या कोषागारातून 3 लाख 75 हजार 817 चोरट्याने लंपास केले. ही घटना शुक्रवार, 28 जूनला सकाळी 8.30 वाजातच्या सुमारास उघडकीस आली.
तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पोस्ट कार्यालयातील कोषागारामध्ये 3 लाख 75 हजार 817 रुपये रोख रक्कम कपाटामध्ये ठेवण्यात आली होती. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने पोस्ट कार्यालयाचा मुख्य दरवाजा तोडून कोषागार मधील कपाट फोडले व त्यातील 3 लाख 75 हजार 817 रुपये लंपास केले. दुसर्‍या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे कार्यालय सकाळी उघडण्यात आले. पोस्ट मास्टर अजित उपरे यांनी कोषागरातील रक्कम काढण्यासाठी येथील कर्मचारी नितीन दाते यांना चाबी दिली. त्यानंतर कर्मचारी कोषागारमधील कपाट उघडण्यासाठी गेले असता कपाट फोडलेले दिसले व त्यातील रोख रक्कम दिसून आली नाही. त्यानंतर कर्मचार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली. पोस्ट मास्टर यांनी तात्काळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी राजुरा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध कलम 380 ,457, 454 भादंवी अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी, हवालदार सुनील गौरकार, किशोर तुमराम करीत आहेत. या घटनेमुळे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पोस्ट कार्यालयाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here