मनसेच्या दणक्यानंतर जेएनपीटीचा निर्णय; गुजरात जाहिरात बंद

147

मुलाखतीही महाराष्ट्रातच होणार, स्थानिकांना मिळणार प्राधान्य 

प्रतिनिधी : संजय पंडित

दि. २७, मुंबई : काही दिवसापूर्वी जेएनपीटी(न्हावासेवा) साठी होणाऱ्या नोकरी भरतीच्या मुलाखती ह्या गुजरातमध्ये होणार अशी जाहिरात प्रसिद्ध झाल्याची माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत दिली होती. त्यानंतर, मनसे नेते अविनाश जाधव आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज जेएनपीटीचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांची भेट घेऊन तात्काळ ही जाहिरात रद्द करुन घेतली. तसेच पुढील सगळ्या मुलाखती महाराष्ट्रात झाल्या पाहिजेत, अशी सक्त ताकीदही मनसेकडून देण्यात आलेली आहे. त्यावर, भविष्यात होणाऱ्या ७० नोकरी भरतीमध्ये सगळी मराठी मुलं असतील अशी ग्वाही जेएनपीटीचे अध्यक्षांनी मनसेला दिली.

marathi reporters jobs
दैनिक मिडिया वार्ता न्यूज

दरम्यान मनसेच्या इशाऱ्यानंतर जेएनपीटीच्या अध्यक्षांकडून तशा आशयाचे पत्र देखील राज ठाकरेंना देण्यात आलं आहे. न्हावा शेवा फ्री पोर्ट टर्मिनल मधील नोकर भरतीबाबत हे पत्र आहे. त्यानुसार, आज २७ जून 2025 रोजी उन्मेष शरद वाघ अध्यक्ष जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधीकरण आणि मनसे नेते अविनाश जाधव ह्यांच्यात झालेल्या चर्चेनंतर न्हावा शेवा फ्री पोर्ट टर्मिनल यांच्या वतीने गुजरात राज्यात देण्यात आलेली नोकर भरती संदर्भातील जाहिरात रद्द करण्यात आली आहे. न्हावा शेवा फ्री पोर्ट टर्मिनल कंपनी ही स्थानिक लोकांना रोजगार देणेबाबत नेहमीच आग्रही भूमिका घेत राहिली आहे, आणि या पुढेही घेतल राहील, असे जेएनपीटीच्या पत्रात म्हटले आहे. तसेच, पुढील नोकर भरतीची प्रक्रिया ही न्हावा शेवा फ्री पोर्ट टर्मिनल आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधीकरण यांच्या चर्चेनी स्थानिक लोकांना सामावून घेणे बाबत राहील, असेही पत्रात नमूद करण्यात आलं आहे. 

दरम्यान, रायगडचे मनसे जिल्हा अध्यक्ष अनिरुद्ध लेले यांनी देखील एन.एस.एफ.टी & जे.एम बक्षी सीएमए टर्मिनल्सच्या सीईओंना पत्र लिहून गुजरात राज्यात झालेल्या नोकर भरती प्रक्रियेला स्थगिती देऊन, स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकर भरती अर्जाकरिता मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. 

न्हावाशेवा फ्री पोर्ट टर्मिनल जे. एम. बक्षी अॅड सी.एम ए. टर्मिनल या आपल्या कंपनीने एका इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये नोकर भरती संदर्भात पोर्टमध्ये काम करण्यासाठी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल डिप्लोमा, BE/B.Tech ह्या प्रशिक्षण घेतलेल्या मुलांसाठी नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. पण संबंधित नोकर भरतीची मुलाखत ही गुजरात राज्यातील मुन्द्रा येथील कार्यालयामध्ये होत आहे. मात्र, या नोकर भरतीचे अर्ज मुलाखती (इंटरव्यू) घेण्यात आल्या आहेत, त्यांना तात्काळ स्थगिती देऊन. उरण जेएनपीटी परिसरातील स्थानिक प्रकल्पग्रस्ताची भरती अर्ज घेण्यासाठी मुदतवाढ देऊन नोकर भरती प्रक्रियाचे अर्ज घेण्यात यावे, अशी मागणी मनसेनं केली आहे.