अजनी ते टेम्भी रस्त्याची झाली दुरावस्था, रस्ता लवकर बनवा गावकऱ्यांची मागणी.

✒साहिल महाजन✒
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
.
यवतमाळ,दि.28 जुलै:- यवतमाळ जिल्हातील नेर तालुक्यातील टेम्भी गावात मोठ्या प्रमाणात रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
नेर वरून 17 किलोमीटर येते असलेल्या टेम्भी या गावामध्ये जाण्याकरिता शिरजगाव -पांढरी -अजनी हा मार्ग आहे, अजनी पर्यंत रस्ता चांगला आहे, पण अजनी ते टेम्भी हे तीन किलोमीटरचा रस्ता अनेक वर्षांपासून न बनल्याने त्या रस्त्याची स्तिथी अत्यंत वाईट झाली आहे. रस्त्यावर अनेक खड्डे तयार झाले आहेत. पावसाळ्यात रस्त्यावर चिखल असल्याने बरेच अपघात झाले आहे. गावकऱ्यांच्या मते, या मार्गावरून प्रवास करतांना खूप वेळा अपघात ही झाले आहेत. रस्त्यावर कैक वर्षापासून शासनाचे व राजकीय पक्षांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हा रस्ता बनला नाही आहे.
गावकऱ्यांनी सांगितल्या प्रमाणे त्यांनी अनेकदा आमदार यांच्या कडे मौखिक स्वरूपात तक्रार केली तरीही हा रस्ता आज पर्यंत बनलेला नाही आहे. रस्ता कित्येक वर्षांपासून बनलेला नाही आहे, त्यामुळे त्यांच्या गावात महामडळाची बस गावात येत नसल्याचे ते सांगतात, सध्या कोरोनाचा काळ सुरू असतांना रस्ता खराब असल्याने एखाद्या बिमार व्यक्तीला त्या रस्त्यावरून नेण्यात खूप त्रास होतो. गावातील विद्यार्थी नेर येथे शाळेत जातात रस्ता खराब असल्याने विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाण्याकरिता वेळ लागतो.
अजनी ते टेम्भी या रस्त्याचा दुरावस्थेचा प्रश्न सोशल मीडियावर गावकरी व तरुण बजावत असतात. गावातील उपसरपंच रवि जाधव, सुरज मते, अभी जाधव, सचिन राठोड, ओम जाधव, राज आडे, रोहित जाधव, रोशन राठोड, राजकुमार, आकाश जाधव आदी गावातील नागरिक सतत गाजवित असतात. पण झोपलेले आहे.
खेड्यातील रस्त्याचे काम योग्य पद्धतीने न करता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ठेकेदार भ्रष्टाचार करत असल्यामुळे आज रस्त्याची ही अवस्था झाली आहे. :- प्रणिल जाधव
खेड्यातील रस्ते ठेकेदार योग्य पद्धतीने करत नाही असा आरोप मनसे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रणिल जाधव यांनी केला आहे, नवीन बांधलेले रस्ते एक वर्षही टिकत नाही असे त्यांनी सांगितले, हे सर्व भ्रष्टाचार संभनदीत अधिकाऱ्यांचा जाणीवपूर्वक लक्ष न देण्याच्या कारणामुळे होते असे त्यांनी सांगितले.