शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ फवारणी करण्याची प्रहारची मागणी

शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ
फवारणी करण्याची प्रहारची मागणी

शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ फवारणी करण्याची प्रहारची मागणी
शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ
फवारणी करण्याची प्रहारची मागणी

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा

हिंगणघाट २८/०७/२१ शहरातील अनेक वॉर्डात डेंग्यू चे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत असून अनेक कुटुंबे या आजाराने त्रस्त झालेले दिसत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे शहरात ठिकठिकानी साचलेले कचऱ्याचे ढिग व त्यामुळे डेंग्यूच्या डासांचा मोठ्या प्रमाणात उपसर्ग वाढत आहे.परंतु एवढया मोठ्या प्रमाणावर डेंग्यूचे रुग्ण वाढत असूनही नप प्रशासन मात्र शहरात कोणतीही कीटकनाशक फवारणी करीत नसल्याने शहरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
नप ने तातडीने शहरात सर्वत्र फवारणी करावी जगोजागी साचून पडलेला कचऱयाचे ढीग त्वरित उचलून नाल्याची सफाई युद्धपातळीवर करावी अशी मागणी रुग्णमित्र गजू कुबडे यांनी नपला पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे हिंगणघाट तालुका प्रमुख जगदीशभाऊ तेलहांडे,सुरज कुबडे,अजय लढी,मोहन पेरकुंडे,राजेश लखाणी,अमोल रामगुंडे,धीरज नंदरे,किशोर देवढे,पवन वाघमारे,पिंटू वडतकर,सुधीर मोरेवार,विक्की सोनकुसरे, संतोष जोशी,सुधीर मोरेवार,राजेश तांदूळकर,भूषण कुंभारे,महेश तांदुलकर, गोलू कुंभारे, शांताराम तराळे,नितीन मोरे,अमित पोतदार,प्रशांत आवारी इत्यादी उपस्थित होते