डोंबिवलीत सेक्स रॅकेटचा पोलिसांनी केला पर्दाफाश, लॉज म्यानेजरसह 6 जणांना अटकेत.

✒अभिजीत सपकाळ✒
ठाणे भिवंडी प्रतिनिधी
9960096076
ठाणे/डोंबिवली,दि.28 जुलै:- मुंबईच्या उपनगर डोंबिवलीतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. पोलीसांनी डोंबिवलीत पाश कॉलोनीत सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. लॉजिंग अँड बोर्डिंगच्या नावावर मागिल अनेक दिवसा पासून सेक्स रॅकेट लपुन सुरु असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारावर पोलिसांनी लॉजिंग अँड बोर्डिंगवर टाकला छाप्यात तेथील चार तरुणींची सुटका करण्यात आली. तर या कारवाईत लॉजिंग-बोर्डिंगच्या माँनेजरसह 6 जणांना बेळ्या ठोकण्यात आल्या.
डोंबिवली पूर्वेकडील जिमखाना रोडला सांगर्ली चौक परिसरात असलेल्या बालाजी दर्शन बिल्डींग साईराज लॉजिंग अँड बोर्डींग आहे. या लॉजमध्ये सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती मिळताच ठाण्याच्या अँटी ह्युमन ट्रॅफिक सेलने सोमवारी रात्री अचानक याठिकाणी छापा टाकला. यावेळी चार तरूणी तेथे वेश्याव्यवसाय करताना आढळून आल्या. या लॉजमध्ये पोलिसांनी बनावटी ग्राहक पाठवून प्रथम खात्री केली होती.
पोलिसांनी छाप्यादरम्यान सदर लॉजिंग-बोर्डिंगचा व्यवस्थापक, रोखपाल, दोन वेटर आणि तरुणींच्या पुरवठादार दोन दलालांच्या तावडीतून 4 तरुणींची सुटका केली. या अवैध मार्गाला लागलेल्या या तरुणींची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली आहे.
या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात लॉजिंग-बोर्डिंगचा व्यवस्थापक, रोखपाल, दोन वेटर आणि दोन दलालांच्या विरोधात या प्रकरणी 376 (2), 370 (3), 34 सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 चे कलम 4 व 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.