जळगाव कारागृहात कैद्याचा मृत्यू

मिडिया वार्ता न्यूज
जळगाव जिल्हा प्रतिनिधी
✒ विशाल सुरवाडे ✒
जळगाव:-28 जुलै- जळगाव कारागृह मध्ये असणार्या पवन महाजन या कैद्याचा आज सकाळी मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. जळगाव कारागृह प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पवनचा मृत्यू झाल्याचा आरोप पवन चे नातेवाईक करत आहे.
पवन च्या नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला.
एरंडोल येथील पवन महाजन हा कैदी जळगाव येथील कारागृहात होता. काही दिवसांपूर्वी त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला रूग्णालयात दाखल केले होते. त्याला मधुमेहाचा त्रास होता.
मात्र याबाबतची कोणतीही माहिती जिल्हा रूग्णालयात दाखल करताना देण्यात आली नाही.
यामुळे त्यांची प्रकृती जास्त बिघडली. यानंतर रात्री त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, कारागृह प्रशासाने पवन याला रूग्णालयात दाखल करतांना कोणतीही काळजी घेतली नाही.
यामुळे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप पवन च्या नातेवाईकांनी केला आहे.
यामुळे प्रशासनावर कारवाई होत नाही तोवर मृतदेह स्वीकारणार नाही असे पवनच्या नातेवाइकांकडून सांगण्यात आले आहे.