महागाई विरोधात काँग्रेसचे आंदोलन

महागाई विरोधात काँग्रेसचे आंदोलन

महागाई विरोधात काँग्रेसचे आंदोलन
महागाई विरोधात काँग्रेसचे आंदोलन

हिंगणा तालुका जिल्हा नागपूर
देवेंद्र सिरसाट

नागपूर हिंगणा : -पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर व जिवनावशक वस्तूंच्या वाढत्या किमती मुळें सर्वसामान्य जनता त्रस्त झाली त्यामुळे केंद्र सरकारने वाढती महागाई ताबडतोब आटोक्यात आणावी या करिता नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेसच्या वतीने आज हिंगणा येथे मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते, जिल्हा परिषदेचे माजी सत्ता पक्ष नेते बाबा आष्टणकर व संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली हिंगणा नागपूर मार्गावर आयसी चौक येथुन सायकल रॅली काढण्यात आली हि रॅली निलडोह,अमरनगर परिसरातून भ्रमन करत झोन चौकात दाखल झाली.या वेळी मोटरसायकल, गॅस सिलिंडर यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली होती.केंद्र सरकार विरोधात कार्यकर्त्यांनी नारेबाजी केली, या वेळी बाबा आष्टणकर, संजय जगताप,शषिकांत थोटे, सिध्दार्थ बागडे, सत्येंद्र सिंह व मोठ्या संख्येने कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.