महाराष्ट्र राज्यात मागिल 24 तासांत 6,857 नव्या कोरोना बांधीत रुग्णांची नोंद, 256 जंनाचा मृत्यू.

✒नीलम खरात✒
मुंबई महानगर प्रतिनिधी
मुंबई,दि.28 जुलै:- महाराष्ट्र राज्यात काही प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. त्यामुळे सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी असणाऱ्या जिल्ह्यांमधून लॉकडाऊनसह निर्बंध पूर्णतः हटवले जाण्याची शक्यता आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णदर 1 टक्क्यापेक्षा कमी आहे, असे जिल्हे लॉकडाऊनमुक्त होण्याची शक्यता आहे. राज्यात असे 14 जिल्हे असून आरोग्य विभागाने याची यादी मुख्यमंत्र्यांकडे सादर केली आहे. पण यादरम्यान राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत असून कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण आज घटले आहे.
महाराष्ट्र राज्यात मागिल 24 तासांत 6 हजार 857 नविन कोरोना वायरस बाधित रुग्णांची भर पडली असून तर, 256 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंद झाला आहे. तर 6 हजार 105 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात मंगळवारी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 12 हजार 645 होती, मात्र आज निम्मी झाली आहे.
आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 62 लाख 82 हजार 914 वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत 1 लाख 32 हजार 145 जणांचा मृत्यू झाला असून 60 लाख 64 हजार 856 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.53 % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर 2.1 % एवढा आहे. सध्या राज्यात एकूण 82 हजार 545 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 73 लाख 69 हजार 757 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62 लाख 82 हजार 914 (13.26 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 88 हजार 537 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 3 हजार 364 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.