तालुक्यातील नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.
सिंधी, धानोरा, टेंभुरवाही, विरूर स्टेशन आणि परिसरातील नागरिकांच्या नुकसानीची केली पाहणी.

सिंधी, धानोरा, टेंभुरवाही, विरूर स्टेशन आणि परिसरातील नागरिकांच्या नुकसानीची केली पाहणी.
✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
राजुरा तालुक्यात २२ ते २३ जुलै रोजी अतीपृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी चंद्रपुर जिल्ह्य़ाचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज राजुरा तालुक्यातील सिंधी, धानोरा, टेंभुरवाही, विरूर आणि परिसरातील अतिवृष्टीने प्रभावित क्षेत्राचे अवलोकन केले. स्थानिक शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले. या प्रसंगी जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या जमिनीचे जे सी बी लावून लेवल करण्यात येईल व परिसरातील शेतकरी, नागरिक यांचे अतिवृष्टीने झालेले नुकसानीचे भरपाई तातडीने करून देण्यात येईल असे आश्वासन दिले. या प्रसंगी प स सदस्य कुंदा जेणेकर, स्थानिक शेतकरी तसेच सिंधी, धानोरा ग्रामपंचायतचे वतीने जिल्हाधिकारी यांना शेतजमीन, पिकांचे झालेले नुकसान लवकरात लवकर भरपाई देण्याचे आणी सिंधी ते विरुर स्टेशन रस्ता दुरवस्ती करण्याबाबत निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी जिल्हा कृषी अधिकारी बऱ्हाटे, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, उपविभागीय कृषी अधीकारी मोरे साहेब, तहसिलदार हरिष गाडे, मंडळ अधिकारी गोरे, तलाठी कोल्हे, प .स. सदस्य कुंदाताई जेनेकर, उपसरपंच रामभाऊ ढुमने, अविनाश जेनेकर, राजु मोरे, मंगेश रायपल्ले, गुलाब धानोरकर, संजय ढुमने, मंगेश जेनेकर, ओंकार मोरे, भाष्कर मोरे यासह स्थानिक शेतकरी उपस्थित होते.