**राष्ट्रीय आदिवासी एकता परीषद, जळगाव यांच्या कडून जळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर*

मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
✒ इसा तडवी✒
मो. 7666739067
**पाचोरा:**आज राष्ट्रीय आदिवासी एकता परीषद जळगाव यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांना विविध मागणीचे निवेदन देण्यात येवुन आंदोलनाचा इशारा देण्यात आला, पाचोरा तालुक्यातील मौजे शेवाळे, पिंप्री खु प्र प्रा, राजुरी, अटलगव्हाण, पिंपळगाव (हरे)आदिवासी तडवी भिल्ल येथील गावांमध्ये आदिवासी समाजाला दफनभूमी ची जागा उपलब्ध करुन द्यावी,कारण स्वातंत्र्य नंतर देखील आदिवासी समाजाला आजपावेतो मुलभूत सुविधांपासून वंचीत राहीलेला आहे,ही मोठी शोकांतिका आहे, शासनाने वेळोवेळी परिपत्रके काढून देखील त्याची अंमलबजावणी झालेली नाही संविधानाच्या अनुच्छेद 244/1 नुसार अनुसूचि 5अंतर्गत जळगाव जिल्हा येत असून देखील आदिवासी समाजातील समस्या सुटलेल्या दिसून येते नाही, तसेच राज्य शासनाने आदिवासी समाजाला खावटी अनुदान घोषित केले, पण बर्याच गरजु आदिवासी कुटुंब या योजने पासुन वंचित राहिले असुन पुन्हा आदेश देण्यात येवुन सर्वे करुन खावटी अनुदानाचा लाभ मिळावा यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले, निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी स्विकारले व समस्या सोडविण्यासाठी चर्चा देखील करण्यात आली. यावेळी
राष्ट्रीय आदिवासी एकता परीषद चे जिल्हा अध्यक्ष रणजीत तडवी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य गफुर तडवी, पाचोरा तालुका अध्यक्ष जलाल तडवी, तालुका सचिव जाकीर तडवी,अँड.श्रीकांत सोनवणे,अँड. अजिंक्य ठाकुर,सरवर तडवी,मुस्तफा तडवी, जिल्हा कार्यकारी सदस्य कन्हैया पवार, आलेरखा तडवी, अफजल तडवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.**