युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा पालिकेत गोंधळ, पटोले यांच्या स्वागताचे बॅनर काढल्याने संताप

 ✒  युवराज मेश्राम ✒
 नागपूर जिल्हा प्रतीनिधी
नागपुर,दि.28 जुलै:- नागपुर महानगर पालिकेने काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वागताचे बॅनर काढल्याने युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा पालिकेत गोंधळ घातला असल्याची बातमी समोर आली आहे.

प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे नागपुर दौ-यावर होते त्याचा स्वागतासाठी काँग्रेस आणि युवक काँग्रेस तर्फे मोठ्या प्रमाणात स्वागत बॅनर लावण्यात आले होते. महानगर पलिकेने ते बॅनर काढल्यामुळे युवक काँग्रेसचे पदाधिकारी संतापले आणि त्यानी महानगर पालिकेत गोंधळ घालायला सुरुवात केली. पालीका आयुक्त यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.

पोलिसांन बरोबर झाली धक्काबुक्की.
युवक काँग्रेसचे पदाधिकारी महानगर पालिकेत गोंधळ घालत होते, याची माहिती पोलिसाना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी आले त्यावेळी पोलिसान बरोबर धक्काबुक्की झाली.