युवा सेना तालूका नागभिड च्या वतिने शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731
नागभिड —शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. उध्दवजी ठाकरे यांचा वाढदिवस, युवासेना नागभीड यांचे वतीने विविध उपक्रम करून साजरा करण्यात आला.
शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. उध्दव साहेब ठाकरे यांच्या 62 वा वाढदिवसाचे औचित्य साधून, नागभीड शिवसेना तथा युवासेना यांचे वतीने विविध माध्यमाच्या उपक्रमामधुन जि. प. प्राथमिक कन्या शाळा नागभीड येथे विद्यार्थिनींच्या हस्ते केक कापण्यात आला त्यानंतर सर्व मुलींना नोट बुक-पेन आणि केकचे वाटप करण्यात आले. त्यांचप्रमाणे विवेकानंद मतिमंद विद्यालय नागभीड येथे सर्व मुलांना मिठाई, फळे आणि चॉकलेट वाटप करण्यात आले.
याप्रसंगी, मनोज लडके उप-तालुका प्रमुख, बंडूभाऊ पांडव उप-तालुका प्रमुख, नाझीम शेख युवासेना ता. समन्वयक, सौ. सरोजताई खापरे महिला आघाडी शहर प्रमुख, अजित गोडे युवासेना ता. प्रमुख, सुनील बोरकर युवासेना शहर प्रमुख, गिरीश नवघडे विभाग प्रमुख, अमित अमृतकर विभाग प्रमुख, वैभव कुंभरे शाखा प्रमुख, शामसुंदर खांदाडे शाखा प्रमुख, मुरली कोसरे, दिलीप मानकर, मोहन कुंभरे, विठ्ठल पानसे, अस्मिक उरकुडे, प्रभू भेंडारकर,सौ. रेणुका पांडव,कु. रिना भांदककर,प्रफुल्ल मोजनकर,श्रीकांत पिसे, रवी राखडे, जगदीश शेंडे, आणि बहुसंख्येने शिवसैनिक व युवासेनाचे पदाधिकारी बहुसंख्खेनी उपस्थित होते.