३५ वर्षीय अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला

३५ वर्षीय अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला

३५ वर्षीय अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
*अजय उत्तम पडघान*✍
🪀 *7350050548* 🪀

वाशीम : -वाशिम इथून जवळच असलेल्या उकळी पेन सर्कलमधील सुकळी शिवारात एका ३५ वर्षे अज्ञात महिलेचे बॉडी नदीपात्रात तरंगुन आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ पसरली आहे. मृत महिलेचची बॉडी तरंगली दिसून येतात तात्काळ नागरिकांच्या साह्याने अनसिंग पोलीस स्टेशन यांना कळविण्यात आले. असून प्राप्त माहितीनुसार पेनगंगा नदी पात्रात एक अज्ञात महिलेची बॉडी मिळाली असून सदर महिला पाण्यात पुरात अंदाजे वाशिम किव्हा बुलढाणा जिल्ह्यातून असू शकते. असा सूत्रांच्या माहितीनुसार अंदाज वर्तविला आहे. महिलेचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्ष असून अंगावरती हिरव्या रंगाचा पेटिकोट व निळसर रंगाचा ब्लाऊज दोन्ही हातामध्ये लाल रंगाच्या बांगड्या, दोन्ही पायांमध्ये तोरड्या, असा महिलेचा वर्ण असून बॉडी ही पाण्यामध्ये असल्यामुळे ती पूर्ण पाने फुलली व फुगली अवस्थेमध्ये आहे. त्यामुळे अध्यापत ही महिलेचा चेहरा हा स्पष्टपणे दिसायला येत नसल्याने अध्यापत ही पूर्ण माहिती स्पष्ट झाली नाही. यावेळी अनसिंग पोलीस स्टेशन येथील संपर्क साधला असता. अनसिंग पोलीस स्टेशनचे पी. एस. आय रवींद्र टाले, समाधान मोहाड, आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तर गावातील तसेच सुकळी येतील प्रतिष्ठित नागरिकांसह पोलीस पाटील लोखंडे देखील घटनास्थळी उपस्थित होते. सदर मृतदेह महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालय येथे देण्यात आले. सदर घटनेचा तपासा अनसिंग पोलीस स्टेशन अंतर्गत करण्यात येत आहे.✍