मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे रविवार रोजी सिल्लोड येथे होणार आगमन

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे रविवार रोजी सिल्लोड येथे होणार आगमन

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे रविवार रोजी सिल्लोड येथे होणार आगमन

✍प्रवीण तायडे ✍
औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी
77095 77113

सिल्लोड : – सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे रविवार रोजी सिल्लोड येथे आगमन होणार आहे शहरातील नगर परिषद प्रशाला येथे स्वागत सत्कार स्वीकारून मुख्यमंत्री उपस्थितांशी संवाद साधणार आहे. आज आमदार अब्दुल सत्तार तसेच पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी सभा स्थळाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला.पावसाचे दिवस असल्याने संपूर्ण कार्यक्रम स्थळ हे वॉटरप्रूफ असणार आहे. महिला -पुरुषांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असणार आहे. आमदार अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विजय मराठे, सिल्लोड शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक मुद्दीराज, सिल्लोड ग्रामीण ठाण्याचे एपीआय सीताराम म्हेत्रे यांच्यासह नॅशनल सुत गिरणीचे संचालक अब्दुल आमेर अब्दुल सत्तार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, नगरसेवक सुधाकर पाटील, विठ्ठल सपकाळ, प्रशांत क्षीरसागर, शेख सलीम हुसेन, राजू गौर, मनोज झंवर, आसिफ बागवान, राजेंद्र ठोंबरे, विशाल जाधव, माजी पं. स. सदस्य शेख सलीम , सचिन पाखरे आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.