अहेरी उप विभाग डोंग्याने नदी ओलांडुन देत आहेत आरोग्य सेवा नवजात जन्मलेल्या बालकास मिळाले अमूल्य लसिकरण. प्राथमिक आरोग्य केंद तोडसा अंतर्गत नदिपलीकडील कुदरी गावात पावसाच्या दिवसात जीव धोक्यात घालुन आरोग्य चमु यांनी नवजात बालकास २४ तासाच्या आत अत्यावश्यक लसिकरन करुन सुरक्षित केलेले आहे.

अहेरी उप विभाग
डोंग्याने नदी ओलांडुन देत आहेत आरोग्य सेवा
नवजात जन्मलेल्या बालकास मिळाले अमूल्य लसिकरण.
प्राथमिक आरोग्य केंद तोडसा अंतर्गत नदिपलीकडील कुदरी गावात पावसाच्या दिवसात जीव धोक्यात घालुन आरोग्य चमु यांनी नवजात बालकास २४ तासाच्या आत अत्यावश्यक लसिकरन करुन सुरक्षित केलेले आहे.

अहेरी उप विभाग डोंग्याने नदी ओलांडुन देत आहेत आरोग्य सेवा नवजात जन्मलेल्या बालकास मिळाले अमूल्य लसिकरण. प्राथमिक आरोग्य केंद तोडसा अंतर्गत नदिपलीकडील कुदरी गावात पावसाच्या दिवसात जीव धोक्यात घालुन आरोग्य चमु यांनी नवजात बालकास २४ तासाच्या आत अत्यावश्यक लसिकरन करुन सुरक्षित केलेले आहे.
✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻
अमितकुमार त्रिपटी
अहेरी-उप जिल्हा प्रतिनिधि ✍🏻✍🏻
मोब 9422891616

अहेरी : – सद्या स्थितीत संपुर्ण महाराष्ट्रात पावसाने धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीत आरोग्य सेवेवर दुष्परिणाम झालेले चित्र पहायला मिळते परंतु अशा परिस्थतीला मात करुन तोडसा येथिल आरोग्य पथकाने नदिपलीकडील कुदरी गावात पोहचुन आदिवासी जनतेस आरोग्य सेवा पुरविण्याचे अमूल्य कार्य केलेले आहे.
सदर घटना या प्रमाणे आहे. दि २६/७/२२ ला नदिपलिकडील मोहुर्ली गावातील गरोदर माता चमरी महारु गावडे वय ३२ वर्षे हिला पोटात दुखत असल्याने तिच्या पती ने मवेली उपकेंद्र येथिल आरोग्य सेविका श्रीमती दुर्वा यांना फोन करुन कळविले व कुदरी नदिच्या घाटावर येवुन रहाण्यास सांगितले. आरोग्य सेवीका व टीम ॲंब्युलन्स घेवुन नदिच्या घाटावर तब्बल २ तास वाट बघुन सुद्धा गरोदर माता पोहचली नाही, नंतर परत फोन करुन यायला जमणार नाही व दुसर्या दिवशी कुदरी ला येवु असे दुरध्वनी द्वारे कळविले.
तेव्हा आरोग्य सेविका व टीम यांनी तोडसा चे मानसेवी वैद्यकिय अधिकारी तथा प्रभारी वैद्याकिय अधिकारी डॅा. राकेश नागोसे यांना कळविले. दुसर्या दिवशी वैद्यकिय अधिकारी सह आरोग्य सेविका, सि एचओ, आरोग्य सेवक हे ॲंब्युलंस सोबत घेउन नदिच्या घाटावर पोहचले व तेथुन गावकर्यांच्या सहकार्याने डोंग्यानी प्रवास करुन नदिपलिकडे पोहचुन तब्बल ४ किमी चा पायी प्रवास करुन कुदरी गाव गाठले. गावात गरोदर मातेला भेट देण्याकरीता पुजारी यांचे घरी गेले असता मातेची प्रसुति पहाटे ३ वाजता घरीच झाल्याचे सांगितले. बाळाची व आईची तपासणी केली असता बाळाचे वजन ३ किलो एवढे आहे. परंतु मातेची आरोग्य तपासणी केली असता रक्ताचे प्रमाण अतिशय कमी ४.५ ग्राम एवढेच आढळले. तेव्हा मातेला संस्थेत भरती करुन रक्त देण्याची गरज आहे असे सांगुन माता व तिच्या पतिला सोबत यायला सांगितले परंतु दोघंही येण्यास नकार दिला. ३-४ तास आरोग्य चमु त्यांचे घरी थांबुन प्राथमिक औषधोपचार करुन पुढील उपचाराकिता संदर्भ सेवेची गरज समजावुन सांगुन सु्द्धा ते तयार झाले नाही, पुजार्यांची परवानगी घेवुनच आम्ही २-३ दिवसांनी येवु असे सांगितले. पुजारीची वाट बघुन सायंकाळ पर्यंत आरोग्य चमु थांबले परंतु त्यांची भेट झाली नाही. शेवटी मातेला दुसर्या दिवशी परत येवु असे सांगुन आरोग्य पथक परत एटापल्ली येथे पोहचले.