आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे,शिवसेना पक्षप्रमुख यांच्या नेतृत्वावर आढळ विस्वास, निष्ठा ठेवून गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रामधील एटापल्ली तालुक्यातील पदाधिकारी तथा शिवसैनिक शपतथत्र लिहून बिनशर्तपाठिंबा
मारोती कांबळे
मीडिया वार्ता न्युज
गडचिरोली जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
मो.नं.९४०५७२०५९३
*एटापल्ली* *:-* आज दिनांक 26/07/2022 रोज मंगळवारी मा. किशोर पोतदार, शिवसेना जिल्हासंपर्क प्रमुख,गडचिरोली यांच्या मार्गदर्शनात अहेरी विधानसभा जिल्हाप्रमुख रियाजभाऊ शेख यांच्या नेतृत्वात अहेरी विधानसभा क्षेत्रातर्गत एटापल्ली तालुका शिवसेना जनसपंर्क कार्यालयाला भेट दिले असता एटापल्ली तालुक्यातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. *शिवसेना जिंदाबाद, मा. उद्धवसाहेब आगे बळो हम तुम्हारे साथ हैं गद्दार आमदाराचा धिक्कार असो* अशा घोषणा करत *श्री कांदे आमदाराचा निषेध व्यक्त केले.* *एटापल्ली तालुका प्रमुख मनिष दुर्गे,युवासेना तालुका अधिकारी अक्षय पुंगाटी नामदेव हिचामी, नगरसेवक सलीम शेख, विभाग प्रमुख* यांच्या दमदार नेतृत्वात सर्वांनी आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख यांच्यावर अढळ विस्वास, निष्ठा ठेवून बिनशर्त पाठींबा दर्शविण्यासाठी शपथपात्रावर लिहून स्वाक्षरी करून दिले.याप्रसंगी अहेरी विधानसभा क्षेत्रातील अरुणभाऊ धुर्वे, उपजिल्हा प्रमुख, बिरजूभाऊ गेडाम, संघटक, तुळजा तलांडे, युवतीसेना अधिकारी, प्रफुल येरणे, अहेरी तालुका प्रमुख, एटापल्ली तालुक्यातील युवासेना पदाधिकारी, शिवसेना पदाधिकारी, संघटक, शहर प्रमुख, शाखा प्रमुख उपतालुका प्रमुख, युवतीसेना तालुका अधिकारी, व बहुसंख्य समस्त शिवसैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.