जुन्नर चे सोनवणे यांची आमदारकी रद्द करण्याबाबत अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपालजी मेश्राम यांना निवेदन
जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही प्रतिनिधी
8806689909
सिंदेवाही :- दि. 25 जुलै 2025 रोजी जुन्नर जि. पुणे येथे आमदार सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली जुन्नर तालुका आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या शासकीय बैठकीला तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख अधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीला संबोधित करतांना आमदार शरद सोनवणे यांनी आदिवासी समाजाचे नेते तथा या राज्याचे आदिवासी विकास विभाग मंत्री मा. ना. प्रा. डॉ. अशोक उईके साहेब यांना या सार्वजिक ठिकाणी आदिवासी मंत्री यांना अपशब्द वापरून जाहीरपणे अपमानित केले . मा.ना.डॉ. उईके साहेब यांनी धारण करीत असलेले मंत्रीपद हे विधिमंडळातील संविधानिक असल्याने या पदाचा अपमान हा शासनाचा सुद्धा अपमान ठरतो. आमदार शरद सोनवणे यांनी जातीय द्वेष भावनेने उर्मटपणे केलेले अश्लील, वात्रट शब्द प्रयोग पाहता राज्यातील तमाम आदिवासी समाज बांधवाच्या भावना दुखावल्या आहेत.
करीता आमदार सोनवणे यांचेवर अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायदा व सायबर कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याची आमदारकी रद्द करून न्याय दयावे. अन्यथा आदिवासी समाज बांधव व संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. कैलास कुमरे भाजपा जिल्हा महामंत्री अनुसूचित जमाती मोर्चा चंद्रपूर. आशिष सहारे युवा नेते युवा मोर्चा जिल्हा सचिव भारतीय जनता पार्टी चंद्रपूर. रेखा गेडाम सामाजिक कार्यकर्त्या जयंत नेताम युवा सामाजिक कार्यकर्ते पळसगाव जाट. . घनश्यामजी गेडाम भद्रावती सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते