धक्कादायक: 19 वर्षीय युवकानं 23 वर्षीय मित्राची धारदार शस्त्रानं वार करून केली हत्या

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953
नागपूर :- नागपूर मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मैत्रीच्या नावाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. नागपूरात दोन दिवसांपूर्वी एका 25 वर्षीय युवकाची दगडानं ठेचून हत्या केल्यानंतर आणखी एक अशीच घटना समोर आली आहे. ब्रेकअप झालेल्या गर्लफ्रेंडसोबत जवळीक वाढवल्याचा कारणातून एका 19 वर्षीय युवकानं 23 वर्षीय युवकाची धारदार शस्त्रानं वार करून हत्या केली आहे. या दुहेरी हत्याकांडानं नागपूर हादरलं आहे.
दीपसिंग राजपूत असं हत्या झालेल्या 23 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तर सम्यम बागडे असं 19 वर्षीय आरोपी तरुणाचं नाव आहे. आरोपी सम्यक आणि मृत दीपसिंग दोघं चांगले मित्र होते. पण एका मुलीच्या कारणातून दोघांत खुन्नस निर्माण झाली होती. यातूनच 19 वर्षीय आरोपी सम्यकनं आपला मित्र दीपसिंग याची निर्घृण हत्या केली आहे. ही घटना इतकी भयानक होती. या घटनेत दीपसिंग घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संबंधित घटना नागपूरच्या कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील क्वेटा कॉलनी परिसरात घडली आहे.
19 वर्षीय आरोपी सम्यक सध्या शिक्षण घेत आहे. मागील काही काळापासून त्याचं एका मुलीसोबत प्रेमसंबंध सुरू होते. पण काही कारणांमुळे दोघांत दुरावा निर्माण झाला. यामुळे सम्यकच्या प्रेयसीनं त्याच्यासोबक ब्रेकअप केला. पण ब्रेकअप झाल्यानंतर मित्र दीपसिंगनं तिच्याशी जवळीक वाढवली. यातून सम्यकला दीपसिंगचा राग आला. यामुळे त्यांनी धारदार शस्त्रानं वार करून हत्या केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कपिलनगर पोलीस करत आहेत.