गोंदीया उपचारासाठी आलेल्या 24 वर्षीय तरुणीचा डॉक्टरने केला विनयभंग.

✒मुकेश चौधरी✒
सहसंपादक मिडिया वार्ता न्यूज
7507130263
गोंदिया:- आज सर्वीकडे महिला अत्याचारा मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसुन येत आहे. गोंदीया जिल्हा मध्ये अशीच एक संतापजनक बातमी समोर आली आहे. रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या तरुणीचा डॉक्टरनेच विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील कट्टीपार भागात हा प्रकार घडला. या प्रकरणी आमगाव पोलिसात डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोंदियात राहणारी 24 वर्षीय पीडित तरुणी आपल्या वडिलांसोबत उपचारासाठी रुग्णालयात गेली होती. यावेळी डॉक्टरनेच तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील कट्टीपार येथे ही घटना घडली आहे. तरुणीच्या तक्रारीवरून पोलीसांनी लंपट डॉक्टरवर गुन्हा दाखल केला आहे. डॉ. हरीणखेडे असे आरोपी डॉक्टरचे नाव असल्याची माहिती आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.