*आगामी चतुर्थ सेमिस्टरच्या रिपीटर परीक्षेसोबत ,चतुर्थ सेमिस्टरच्या रेगुलर परीक्षा घ्या*
*महेश कोलावारांची* *विद्यापीठाकडे मागणी*

*महेश कोलावारांची* *विद्यापीठाकडे मागणी*
✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
चंद्रपूर:-आगामी चतुर्थ सेमिस्टरच्या रिपीटर परीक्षेसोबत,चतुर्थ सेमिस्टरच्या रेगुलर परीक्षा घेण्याची मागणी महेश कोलावार यांनी उप-कुलगुरु गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली यांच्याकडे पञाद्वारे केली आहे.
नुकताच बी.एड अभ्यासक्रमाच्या प्रथम,तृतीय व चतुर्थ सेमिस्टरच्या रेगुलर व रिपीटरच्या परीक्षा झाल्या अाहेत.तर या परीक्षेच्या आधी आम्ही तृतीय सेमिस्टर रिपीटरचे विद्यार्थी तृतीय सेमिस्टरच्या परीक्षा चतुर्थ सेमिस्टरच्या अगोदर घेऊन आम्हाला चतुर्थ सेमिस्टरमध्ये प्रवेश देण्याची मागणी केली होती.पण काही कारणास्तव विद्यापीठांनी तृतीय सेमिस्टर(रि) व चतुर्थ सेमिस्टर (रे)च्या परीक्षा सोबतच घेतले आहेत.त्यामुळे आम्ही चतुर्थ सेमिस्टर मध्ये जाऊ शकलो नाही.
तर येत्या तीन महिण्यामध्ये चतुर्थ सेमिस्टरच्या रिपीटर परीक्षा होऊ घातली असून त्या परीक्षेसोबत नुकत्याच दिलेल्या तृतीय सेमिस्टर(रि)परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांची चतुर्थ सेमिस्टर रेगुलर परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी महेश कोलावार यांनी केली.