डेंग्यू आजाराने घेतला तिघांचा बळी ; गोंडपिपरी तालुक्यातील तारसा बुज येथिल गावकरी भयभित

✒ राजू ( राजेंद्र ) झाडे ✒
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी: – गोंडपीपरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या तारसा बूज.ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे गावात डेंगू सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.मलेरिया, हिवताप सारख्या संसार्गजन्य आजाराची लागन वाढली आहे. रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने गावकरी धास्तावले आहेत.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे हिवताप, डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजाराची साथ गावात पसरली आहे. पावसाळ्याच्या दिवसात आठवड्यातून दोनदा डास प्रतिबंधक फवारणी करणे स्थानिक प्रशासनाचे कर्तव्य असताना मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.गेल्या आठवडाभरात डेंगू या आजाराने गावात तीन बळी घेतले.गावात अनेक ठिकाणी पाणी साचलेले आहे.नाल्या तुडुंब भरलेल्या आहेत.खुल्या जागेवर कचरा साचलेला आहे.मात्र स्वच्छतेबाबत गावात पुरता ठतठणाट आहे.ग्रामपंचायतेचा दुर्लक्षामुळे गावात घाणीचे साम्राज्य पसरले.परिणामी गावात तापाची साथ वाढली,असा आरोप गावकरी करीत आहेत.