कलाकारांचा हक्कासाठी आता लढणार संघटना ;गोंडपिपरीत कलाकारांचा संघटनेची स्थापना
न्याय हक्कासाठी एकवटले,गोंडपीपरीचे कलावंत

गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपीपरी : – कोरोनाचा संकट काळात शासनाने सर्व कलावंताचा रोजगार हिरावला.त्यामुळे कालावंतावर उपासमारीची वेळ आली. आपल्या न्याय व हक्कासाठी संघटनेची गरज लक्षात घेता गोंडपीपरी तालुक्यातील कलावंतांनी एकत्र येत गोंडपीपरी तालुका कलाकार संघाची स्थापना करण्यात आली.
सर्वप्रथम गोंडपीपरी तालुक्यातील नाटककार दिवंगत ताराचंद उराडे ,संतोष झाडे,विलास पामुलवार , भारती काळे,मंगेश टेम्भुरने, तुलसी चहारे यांना श्रद्धांजली अर्पण करून एक मिनिटांचे मौन पाळण्यात आले. लगेच झाडीपट्टीचे चामोर्शी तालुक्यातील कलावंत अखिल भासारकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. त्यात अध्यक्ष म्हणून अखिल पुरुषोत्तम भसारकर यांची निवड करण्यात आली.तर सचिव म्हणून अक्षय उराडे आणि उपाध्यक्ष म्हणून नितीन धानोरकर यांची निवड करण्यात आली. तसेच कोषाध्यक्ष म्हणून नरेश शेंडे,सहसचिव स्वप्नील निमगडे, प्रसिद्धी प्रमुख राजकपूर भडके,निलेश झाडे,तर सल्लागार म्हणून विसवास पुडके, दिलीप अड्डपवार यांची निवड करण्यात आली सदस्य म्हणून मंगेश पेंदोर,दामू शेंडे,संदेश भसारकर,राजू सोयाम यांचाही समावेश करण्यात आला.भविष्यात या तालुका कलाकार संघाची फार मोठी वाटचाल राहणार असल्याचे मत अध्यक्ष अखिल भसारकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन संदेश भसारकर यांनी केले तर आभार राजकपूर भडके यांनी मानले.