टी व्ही सुरु ठेवला म्हणुन पतीने केली पत्नीची आवळला गळा हत्या, 6 महिन्याची मुलगी झाली पोरकी!

MVN क्राईम रिपोर्टर✒

पुणे/मावळ,दि.28 ऑगस्ट:- पुणे जिल्हातील मावळ तालुक्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. पती आणि पत्नी मध्ये वाद होणे ही नवी बाब नाही. पण, अगदी क्षुल्लक कारणावरून सहा महिन्यांच्या बाळंतीण पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये घडली आहे. टीव्ही का सुरु केला, या एका कारणावरून निर्दयी पतीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. त्याच्या या कृत्यामुळे सहा महिन्यांच्या मुलीच्या अंगावर आईचे छत्र हरपले आहे.

पोलिसांन कडुन प्राप्त माहितीनुसार, मावळ तालुक्यातील चांदखेड येथे ही संतापजनक घटना घडली आहे.  चांगुणा योगेश जाधव वय 20 वर्ष असं हत्या झालेल्या विवाहित महिलेचं नाव आहे. पती योगेश जाधव हा चांगुणाला बाळंतपणात पहिली मुलगी का जन्माला घातली म्हणून तिचा माघील अनेक दिवसा पासून सतत छळ करत होता.

पती आणि पत्नी मध्ये यावरून रोज वाद व्हायचे. परंतु, निमित्त झाले टीव्हीचे. रात्रभर टीव्ही सुरू राहिल्याने दोघांत वाद झाला, आणि त्याचे पर्यावसन तिच्या हत्येत झाले. नराधम पतीने आपल्या सहा महिन्यांच्या चिमुकलीचा विचार न करता पत्नीचा गळा दाबून खून  केला. आरोपी पतीला योगेश जाधवला शिरगाव परंदवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आरोपी पती योगेश जाधव हा मोलमजुरी करून उदरनिर्वाह करायचा. परंतु तो गेल्या काही महिन्यांपासून विचित्र वागत असल्याने मयत पत्नी आपल्या चिमुकलीला घेऊन माहेरी गेली होती. हत्येच्या आदल्या दिवशी ती नवऱ्याकडे नांदायला आली होती आणि त्यात ही दुर्दैवी घटना घडली. दोघांचे कडाक्याचे भांडण झाले आणि रागाच्या भरात योगेशने पत्नीची हत्या केली. या घटनेने चांदखेड गावातील ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत आहे.