सुरत- महाड एस टी बस मधून गुटख्याची तस्करी…..महाड शहर पोलिसांची मोठी कारवाई

सचिन पवार 

रायगड ब्युरो चीफ

मो:8080092301

रायगड :- गणपती उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. चाकरमानी हे कोकणात दाखल होत असल्याने,सणाची धूम सर्वत्र चालू राहणार आहे. महाड बस स्टँड वर प्रवाश्यांची गर्दी देखील होत आहे.त्याचा फायदा घेत महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा गुजरात राज्यातुन सूरत हुन महाराष्ट्र राज्यात आणण्यात आला.हा गुटखा चक्क प्रवासी वाहतुक करणाऱ्या एस टी बस मधून महाड मध्ये आणण्यात गेला आला असून . सूरत हुन महाड मध्ये आलेली एस टी बस मधून शिट च्या खाली, चक्क हा गुटखा ठेवुन आणण्यात आला.

महाड आगार प्रमुख शिवाजी जाधव यांच्या जागृते मुळे या गुटख्याची तस्करी उघड झाली आहे .

तस्करी करण्यात आलेल्या विमल गुटख्याच्या तीन बॅग आणी वाहकाच्या बॅग मध्ये देखील गुटख्ख्याचे पॉकीट हस्तगत करण्यात आले आहे . महाड पोलिसांनी पडदा फाश करून या गाडीचे चालक वाहक यांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास महाड शहर पोलीस करीत आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here