सावली शहरातून केला जातोय तालुक्यात अवैध दारुचा पुरवठा

53

सावली शहरातून केला जातोय तालुक्यात अवैध दारुचा पुरवठा

बाबा मेश्राम

सावली तालुका प्रतिनिधी

7263907273

सावली: सहा वर्षाच्या दारुबंदी नंतर चंद्रपूर जिल्ह्यातील दारु महाविकास आघाडी सरकारने जुलै 2021 मध्ये सुरू केली, अनेक निवेदने, ग्रामपंचायत ,नगरपंचायत ,नगरपरिषद, यांच्या मार्फत नाहरकत प्रमाणपत्र ,दारुबंदीत पुरवठा होणारी अवैध दारू, सोबतच ग्रामीण जनतेला होणारा आर्थिक भुर्दंड या सर्व बाबींचा विचार करन महाविकास आघाडी सरकारने जिल्ह्यातील दारुबंदी हटवली, सोबतच जुन्या च परवाना धारकांना दारुभट्टी, बिअर बार,वाईन शापी टाकण्याची परवानगी देण्यात आली,असे असतानाही सावली शहरातुन ,तालुक्यातील ईतर गावात अवैध दारुचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत असताना या बाबीकडे पोलीस विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे ,त्यामुळे दारु बंदीत होणारी अवैध दारुची वाहतूक ,दारु बंदी उठविल्यानंतर जैसे तसी असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यातील दारुबंदी हटविण्यानंतर परमीटची देशी दारु जिल्ह्यासह तालुक्यातील दारु भट्टीत येऊ लागले ,त्यामुळे आंबटशौकीन लोकांना सुध्दा त्या दारुची ईच्छा पुर्ण होऊ लागली आणि गावातच परमीट ची दारु मिळत असल्याने लोकांचा लपुनछपुन पिण्याचा त्रास वाचला ,सावली शहरात दोन दारुभट्टी,व पाच बिअर बार आहेत तर तालुक्यात सुध्दा वाईन शाप ,बिअर बार असताना , काही लोक अवैध दारु ची मोठ्या प्रमाणात वाहतुक करताना दिसतात ,त्यातच तालुक्यातील ग्रामीण भागात हरंबा,जिबगाव उसेगाव, निमगाव अंतरगाव ,दाबगाव ,करोली, विहीरगाव आदी गावात तर हरणघाट मार्गावरून गडचिरोली जिल्ह्यात सुध्दा मोठ्या प्रमाणात अवैध देशीचा दारुचा पुरवठा होत आहे.

त्यातच सणासुदीच्या काळात दारु दुकाने बंद असताना ही मागच्या दारातुन शटर खोलुन दारु पुरवठा केल्या जातो ,यात आर्शिवाद कोणाचा? हा प्रश्न अंधातरी असताना। संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा सावली शहरात सुरु आहे ,याकडे पोलीस विभागाने लक्ष देऊन अवैध होणारी दारुची वाहतुक थांबवावी, अशी चर्चा स्थानिक रहिवासी दबक्या आवाजात करताना दिसत आहेत.