आज कोणीही राखीची वाट पाहात नाहीत?

57

आज कोणीही राखीची वाट पाहात नाहीत?

           आज राखीचा सण पाहिला आणि त्याचा विचार केला तर असं जाणवतं की हा राखीचा सणच यायला नको. कारण आजच्या काळात राखीच्या नावावर बहिण भावाकडून मोठमोठ्या अपेक्षा करते. त्या अपेक्षा राखीचा एक धागा बांधून पुर्णही करुन घेते. परंतु भावावर संकट आल्यास त्याला मात्र ती मदत करीत नाही. त्याला नक्कीच वा-यावर सोडते. 

          पुर्वीच्या काळात असं नव्हतं. बहिण भावाला राखी बांधायची. त्यांच्याकडून अपेक्षा करायची. त्या अपेक्षा पुर्ण करुन घ्यायची नव्हे तर भावाला मदतही करायची त्याच्या संकटसमयी. याबाबत उदाहरण महाभारताचं नक्कीच देता येईल. महाभारतात द्रोपदीनं क्लिष्णाला मदत केली होती. क्रिष्णाच्या करंगळीतून एकदा सुदर्शनामुळं रक्त निघताच त्या करंगळीला बांधण्यासाठी तिनं आपलं नवं कोरं वस्र फाडलं होतं असं मानलं जातं. त्यानंतर क्रिष्णानंही तिला वस्रहरणाचे वेळेस वस्त्र पुरवून तिची अब्रू वाचवली होती. 

            राखी……..बहिण भावाला बांधत असते. कशासाठी तर त्या भावानं आपल्या बहिणीनं रक्षण करावं. तिचा मानसन्मान जोपासावा. लहान असेल तर तिला न्हाऊ पिवू घालावं. तिचे दुःख दूर करावे नव्हेतर ते दुःख दूर करण्याचा प्रयत्न करावा. शपथा घ्याव्या की मी माझ्या बहिणीला मुळीच त्रास होवू देणार नाही. 

           राखी सण जेव्हा येतो. तेव्हा भावाला बहिण राखी बांधते. बदल्यात भाऊही तिला भरभरुन प्रेम देतो. काही वस्तूही देतो नव्हे तर रक्षणही करतो. स्वराज्य टिकवीत असतांना एकदा सम्राट अकबराला चितोडकडून राखी बांधलेली आहे.

           रक्षाबंधन हा सण आनंदाचा, उत्साहाचा. दूर असलेल्या भावाला राखी पाठवायची बहिणीची घाई आधीपासूनच सुरु होते. त्या दिवशी जेवणात काय पदार्थ असणार हे सगळ्यांनाच ठाऊक असतं. साखरभात नाही तर करंज्या किंवा वडे पापडं असेच काही असणार. हे आधीच माहीत होतं. संरक्षण करणे, संरक्षण देणे हे केवढं मोठं काम आहे. आज राखीचा सण. आपण तो का आणि कशासाठी साजरा करतो? असं जर कोणाला विचारल्यास कोणीही सांगेल की आज राखीपौर्णिमा आहे. आज बहीण तिच्या भावाला राखी बांधते. राखी हे बहीण- भावाच्या प्रेमाचं प्रतीक आहे. बस एवढंच? आणखी काय महत्त्व आहे या सणाचं? तर राखी म्हणजे रक्षा, बहिणीचं रक्षण करण्याचं बंधन. कोणाला भाऊ नसेल किंवा एखाद्याला बहीण नसेल तर मग मानलेल्या भावालाही राखी बांधली जाते. आम्ही वर्गबांधवांनाही राख्या बांधतो. 

            राखी म्हणजे संस्कार. काही वेळेस आपली परंपरा, संस्कृती, इतिहास जर कोणाला समजली तर त्यांच्या ज्ञानात भर पडते. राखी स्त्रीने पुरुषाला बांधायची. म्हणजे त्या स्त्रीचं रक्षण करण्याची जबाबदारी त्या पुरुषानं स्वीकारायची. स्त्रिला संपूर्ण संरक्षण देणं त्या पुरुषाचं कर्तव्य ठरतं. पुराण कथेनुसार सगळ्यात पहिली राखी इंद्राणी म्हणजेच इंद्राच्या राणीनं आपला पती इंद्र याला बांधली. देव-देवतांच्या संग्रामात देवांचा पराजय झाला तर मोठं संकट ओढवेल म्हणून त्यापासून संरक्षण मागण्यासाठी राखी बांधली गेली असं म्हणतात. कालांतरानं श्रीकृष्णानं युधिष्ठिराला रक्षाबंधनाचे महत्त्व सांगितले. इतिहासात तशी नोंदच आहे. तशी आणखी एक इतिहासात अशी नोंद आहे की मुगल साम्राज्यात हिंदू स्त्रियांवरचे अत्याचार थांबविण्यासाठी, रक्षण मिळविण्यासाठी राजपूत स्त्रियांनी अकबर बादशाहला राखी बांधली. बादशाहानेही त्याचाच मान करुन स्त्रियांवरचे अत्याचार बंद केले. आताही स्त्रिया सीमेवर तैनात असलेल्या जवानांना राखीपौर्णीमेला आवर्जून राख्या पाठवतात.

           रक्षणाचे बंधन म्हणजे राखी. राखी म्हणजे केवळ रंगीत दो-यात मणी ओवून मनगटावर बांधून मिरवण्यासाठी काही तो दागिना नाही. त्याचं विशेष महत्व आहे. तसं स्थानही. तसं पाहता राखी म्हणजे एक सुशोभन करुन तयार केलेला धागा नाही तर तो एक साधा धागाही असू शकतो. तसंच तो राखीचा धागा बांधणं म्हणजे संरक्षण करुन घेणं नाही. त्या राखीच्या बंधनाच्या मागं काही वेगळ्या प्रकारच्या अलौकिक अशा भावना असतात. त्या भावना पाहिल्या तर कुणालाही गहिवरुन आल्याशिवाय राहात नाही. 

          राखी बांधणं वा बांधून घेणं हा संस्कारच. ज्यांना राखीचा हा धागा बांधला जातो. तो व्यक्ती काही का असेना, आपल्या हस्ते राखी बांधणा-या आपल्या बहिणीचं संरक्षण करीत असतो. ज्याला ही राखी बांधली जाते. त्या व्यक्तीच्या मनात ती राखी जी बांधते, त्या स्रीबाबत काहीही उणंदुणं असल्यास ते उणंदुणं ती व्यक्ती विसरुन जाते व तिचं संरक्षण करण्याचा विचार करते. 

           राखी हे पवित्र बंधन असून या राखीनं मोठमोठी युद्धही थांबलेली आहेत नव्हे तर थांबवली गेली आहेत. पुर्वी याच राखीच्या धाग्याला मोठा सन्मान दिला जाई. राखी बांधणा-या आपल्या बहिणीला ओवाळणी म्हणून भाऊ तिचे केवळ संरक्षणच करीत नव्हता तर तिच्यासाठी जीवही देत होता. म्हणतात की सुदामा जेव्हा क्रिष्णाला भेटायला व मदत मागायला गेला. तेव्हा द्वारकेमध्ये राखीचा उत्सव झाला होता व सुदामाला सर्व श्रीकृष्ण दरबारातील स्रियांनी राख्या बांधल्या होत्या. 

           महत्वाचं सांगायचं म्हणजे राखीचा हा पवित्र धागा. त्याला पवित्र महत्व प्राप्त झालं. ते त्या धाग्यानं केलेलं अलौकिक कार्य. पुर्वीच्या काळात त्या धाग्यानं असे असे कार्य केले की जे कार्य आश्चर्यचकीत करणारं वाटतं. तसं पाहिलं तर पुर्वी स्वार्थ नव्हता. आजचा काळ वेगळा आहे. आजच्या काळामध्ये फक्त बहिणी, ही राखी बांधून भावाकडून फायदा करुन घेतात. परंतु जेव्हा भावाला बहिणीची आवश्यकता असते, तेव्हा मात्र नाक मुरडतात. याचाच अर्थ त्या अशा संकटात सापडलेल्या आपल्या भावांना मदत करीत नसल्याचं दिसते. यात विशेष सांगायचं म्हणजे राखीचा हा धागा केवळ बहिणीलाच भावानं मदत करण्यासाठीच नसावा तर बहिणीनंही भावाला मदत करण्यासाठी असावा. तसंच राखीचा हा धागा रेशमाचाच असावा असा नाही. तो साधाही असला तरी चालावा. परंतु प्रत्येक बहिणीनं तो काळजीपोटी बांधावा. तो धागा बांधतांना एक शपथ घ्यावी की जशी मी माझ्या भावाकडून मला त्यानं मदत करावी अशी अपेक्षा करते. तशी मिही त्याची मदत करीन. भावानं बहिणीच्या या पवित्र धाग्याची लाज राखावी. तिला मदत करावी. तसंच बहिणीनंही वेळप्रसंगी आपल्या भावाची मदत करावी. जेणेकरुन प्रत्येक भावाला आपल्या बहिणीबद्दल हेवा वाटेल. तसाच तो आवर्जून राखी सण येण्याची सतत वाट पाहात राहील. हे तेवढंच खरं आहे. यात आतिशयोक्ती नाही.  

अंकुश शिंगाडे, नागपूर

मो: ९३७३३५९४५०