पेसा शिक्षक भरतीसाठी कक्षदालनाचे उद्घघाटन

सुनिल जाबर

जव्हार प्रतिनिधी

जिल्ह्यात पेसा शिक्षक भरती करण्याच्या अनुषंगाने पात्र उमेदवारांना योग्य मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक येथे पेसा कक्ष दालन स्थापन करण्यात आला असून जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम ,आमदार श्री निवास वनगा ,उपनेते राजेश शहा ,मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे ,उपाध्यक्ष पकंज कोरे,जिल्हा परिषद सदस्य देवानंद शिंगडे यांच्या हस्ते या दालनाचे उद्घघाटन करण्यात आले.यावेळी शिक्षणाधिकारी प्राथमिक शेषराव बडे उपस्थित होते.

   पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असून ६ तालुके पूर्ण पेसा २ तालुके अंशत पेसा आहेत .संचमान्यता २०२२ – २३ नुसार जिल्ह्यात पेसा क्षेत्रात एकूण रिक्त पदे १८०७ आहेत त्यापैकी १३१८ पदे भरण्यास शासनाने जिल्हा परिषदेला परवानगी दिली आहे .यासाठी २०२२ मध्ये शिक्षक परीक्षा दिलेल्या पालघर जिल्ह्यातील स्थानिक आदिवासी २५५६ उमेदवारांची गुणवत्ताक्रमानुसार यादी जिल्हा परिषदेला प्राप्त झाली आहे. सदर यादीतील अपात्र उमेदवार वगळणे ,पात्र उमेदवारांची गटनिहाय सेवाज्येष्ठता अंतिम करणे ,समांतर आरक्षण यादी बनवणे ,कागदपत्र पडताळणी करून नियुक्तीसाठी रिक्त जागा निश्चित करून त्यानुसार समुपदेशन करणे यासाठी जिल्हा पडताळणी समिती सहकार्य करणे व उमेदवारांना योग्य ते मार्गदर्शन करणे यासाठी कक्षाची स्थापना करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here