तालुका अहेरीअंतर्गत ग्रामपंचायत नागेपल्ली येथील शाहूनगर समोरील वनजमिनीवरील अतिक्रमण धारकांना नाहक त्रास,  जमीन हडपण्याच्या षडयंत्राला शिवसेना (उबाठा) यांचा तीव्र विरोध

मारोती काबंऴे

गडचिरोली जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि

मो.नं.9405720593

अहेरी तालुक्यातील नागेपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत शाहूनगर समोरील वनजमिनीवर मागील 10 -15 वर्षांपासून झोपड्या बांधून 15 – 16 कुटुंबे वास्त्यव्याला आहेत. सदर जमीन अहेरी – आलापल्ली मार्गाला लागून आहे. या जमिनीवर काही धनाढ्य लोकांचा नजर लागल्याने सदर ग्रामपंचायत मधील सदस्य याच जमिनीवर समशान घाट विकसित करण्याचा षडयंत्र रचले असून अन्यायग्रस्त कुटूंब भयभीत होऊन शिवसेना (उबाठा )पदाधिकारी याचेकडे मदतीची हाक दिल्याने क्षणाचा विचार न करता मा. वनसरक्षक, आलापल्ली व मा वनपरीक्षेत्र अधिकारी, अहेरी यांना दिनांक 22/05/2023 निवेदन दिले असता त्या निवेदनावर काहीच कार्यवाही करण्यात आले नाही.

परंतु याच जमिनीवर वनविभाग कर्मचारी व नागेपल्ली ग्रामपंचायत सदस्य मिळून मोजमाप करने सुरु केले यावरून अशी शंका निर्माण झाले की हे सर्व मिळून पुन्हा काहीतरी षडयंत्र रचित आहे म्हणून मा मुख्य वनसरक्षक, गडचिरोली यांचे कडे निवेदन दिले असता त्यांनी योग्य न्याय देण्याचे आश्वाशन दिले. याप्रसंगी विलास कोडापे,अहेरी विधानसभेचे सहसंपर्क प्रमुख, अरुण धुर्वे, उपजिल्हा प्रमुख, बिरजूभाऊ गेडाम, संघटक अहेरी विधानसभा, चंदना बिष्णोई, उपजिल्हा संघटिका, राजू मामीडवार, जेष्ठ शिवसैनिक, अन्यायग्रस्त कुटुंब बक्का गुट्टा गावडे, रामबाई बक्का गावडे, शेख जलील जब्बार हे उपस्थित होते.l

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here