‘लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण’ नागपूरातील कायदा-सुव्यवस्था स्वतःच गुन्हेगारीच्या उंबरठ्यात: आमदार डॉ नितीन राऊत

‘लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण’
नागपूरातील कायदा-सुव्यवस्था स्वतःच गुन्हेगारीच्या उंबरठ्यात: आमदार डॉ नितीन राऊत

‘लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण’ नागपूरातील कायदा-सुव्यवस्था स्वतःच गुन्हेगारीच्या उंबरठ्यात: आमदार डॉ नितीन राऊत

✍🏻मंजुषा सहारे ✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मोबाईल नं 9373959098

नागपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की जेव्हा पासून श्री. देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे तेव्हा पासून महाराष्ट्रात गुन्हेगारीचा सुळसुळाट उच्चांकाला पोहोचला आहे. हिट अँड रन, महिला अत्याचार, अंमली पदार्थांचे सेवन व तस्करी प्रकरण अशा नाना प्रकारच्या घडामोडीने सामान्य माणूस त्रस्त झाला आहे. आता तर मर्यादा ओलांडून चक्क नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्यातच पोलीस कर्मचारी बेछूटपणे जुगार खेळत आहेत.

इथले उपमुख्यमंत्री तुम्ही, इथले गृहमंत्री तुम्ही, इथले पालकमंत्री तुम्ही तरीही असा बेजबाबदारपणा ?
जर कायदा व्यवस्थाच गुन्हेगारी करत असतील तर सामान्य जनता कशी काय सुरक्षित असू शकते ? नाहीतरी तुमच्या राज्यात सामान्य माणसाचे आयुष्य पाला पाचोळ्याप्रमाणे आहे…
आता हीच जनता ज्यांना तुम्ही मूर्ख समजता ती विधानसभा निवडणुकीला तुमचा फडशा पाडल्या शिवाय गप्प बसणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here