ब्लू लाईनवर असलेल्या घरांवर सुरु असलेली कारवाई तात्काळ थांबवा - आ. किशोर जोरगेवार • बैठक घेत मनपा प्रशासनाला निर्देश

ब्लू लाईनवर असलेल्या घरांवर सुरु असलेली कारवाई तात्काळ थांबवा – आ. किशोर जोरगेवार

• बैठक घेत मनपा प्रशासनाला निर्देश

ब्लू लाईनवर असलेल्या घरांवर सुरु असलेली कारवाई तात्काळ थांबवा - आ. किशोर जोरगेवार • बैठक घेत मनपा प्रशासनाला निर्देश

🖋️ मीडियावार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 28 ऑगस्ट
चंद्रपूर शहर वाढत असताना नागरी वस्त्यांसमोर वन विभाग, पुरातन विभाग यांच्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यातच आता ब्लू लाईनवरील बांधकामावर महानगरपालिका प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे चंद्रपूरकरांनी जायचे कुठे असा प्रश्न उपस्थित करत. “एकाही घराला हात लावू नका, ब्लू लाईनवरील घरांवरील कारवाई तात्काळ थांबवा,” असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांना दिले आहेत.
आज आमदार किशोर जोरगेवार यांनी महानगरपालिकेत बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. बैठकीला मनपा आयुक्त विपिन पालीवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त रविंद्र भिलावे, शहर नगररचनाकार दहिकर, सहायक नगररचनाकार भोयर, शिरभाते यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.
शहरातील ब्लू लाईनवरील घरांना काढून टाकण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या संदर्भात नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त करत, आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेतली होती आणि सदर कारवाई थांबविण्याची मागणी केली होती.
ब्लू लाईनवरील बांधकामे वर्षानुवर्षे अस्तित्वात असून, या भागातील अनेक नागरिकांचा व्यवसाय आणि नागरी वस्ती यावर अवलंबून आहे. ही घरे आणि आस्थापने तोडल्यास अनेक लोकांचे रोजगार आणि जीवनमान धोक्यात येईल. त्यामुळे या निर्णयावर मनपा ने पुनर्विचार करवा अशी मागणी नागरिकांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडे केली. त्यानंतर, आज मंगळवारी, आमदार जोरगेवार यांनी मनपा अधिकाऱ्यांची बैठक घेत सदर कारवाई थांबविण्याचे निर्देश दिले.
मागील अनेक वर्षांपासून नागरिक येथे राहत आहेत आणि अनेकांचा व्यवसायही येथे आहे. आधीच अनेक प्रतिबंधाच्या अडचणी नागरिकांपुढे आहेत. अशात मनपाने ब्लू लाईनवरील घरांवर सुरू केलेली कारवाई योग्य नाही. यापुढे एकाही बांधकामावर कारवाई करण्यात येऊ नये, असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार मानले. या बैठकीला संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here