संविधानातील मुलभूत अधिकार हिरावून घेता येणार नाही

संविधानातील मुलभूत अधिकार हिरावून घेता येणार नाही

संविधानातील मुलभूत अधिकार हिरावून घेता येणार नाही

• सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन
• चंद्रपुरात संविधान जागर यात्रेचे स्वागत

🖋️ मीडियावार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 28 ऑगस्ट
आज संविधानाबाबत अनेक गैरसमज पसरवून सामाजात द्वेष पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात सर्व मलूभूत अधिकार अबाधीत ठेवण्यासाठी तरतूद करून ठेवली असून, हे मुलभूत अधिकार कुणालाही हिरावून घेता येणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त संविधान जागर समिती महाराष्ट्रच्या वतीने संविधान जागर यात्रा-2024 चे सत्याग्रह भूमी महाड ते चैत्यभूमी दादर मुंबई पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून 6 हजार 500 किलोमिटरचा प्रवास करून 27 ऑगस्टला चंद्रपूर शहरात पोहचली. यावेळी मोठ्या जल्लोषात या यात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून येथील संताजी जगनाडे सभागृह येथे मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा झाली. यावेळी ते मार्गदर्शन करीत होते.
सभेला यात्रेचे राज्य संयोजक आकाश अंभोरे, नागसेन पुंडगे, संविधानाचे अभ्यासक अ‍ॅड. वाल्मिकतात्या निकाळजे, डॉ. आंबेडकर फाऊंडेशन नवी दिल्ली संचालक योजना ठोकळे, भाजपा अनुसूचति जाती मार्चाच्या उपाध्यक्ष स्नेहा भालेराव, बौद्ध युवक संघटनेचे अध्यक्ष विजय गव्हाळे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नातू राजेंद्र गायकवाड, जयभीम आर्मीचे संतोष गवळी, अशोक गायकवाड यांची उपस्थिती होती.
मुनगंटीवार म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वज्ञानी होते. त्यांच्या ज्ञानाच्या मंथनातून संविधान जन्माला आहे. या संविधानाने सर्वांना समान अधिकार दिले आहे. मात्र, भंडारा लोकसभा निवडणूकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव करून त्यांना संसदेत न येऊ देण्याचे पाप काँग्रेसने केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या कर्तृत्वाची उंची प्रचंड असताना त्यांना भारतरत्न हा सन्मान कधीही दिला नाही. काँग्रेसने स्वत:च्या स्वार्थासाठी संविधान बदलविण्याचा अनेकदा प्रयत्न केला. जनतेला निस्वार्थ भावनेने सत्य सांगण्यासाठी त्यांना मूलभूत कर्तव्याची माहिती देण्यासाठी ही संविधान जागर यात्रा निघाली असून, जनतेने संविधानातील तरतूदीचे वाचन करावे. यावेळी अ‍ॅड. वाल्मिकतात्या निकाळजे यांनीही मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक ब्रिजभूषण पाझारे यांनी, तर संचालन सविता कांबळे यांनी केले. यावेळी नागरिक आणि संविधान प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन संविधान जागर समिती, चंद्रपूरचे संयोजक ब्रिजभुषण पाझारे, सह संयोजक राजेश थुल, सविता कांबळे, गौतम निमगडे, विजय वानखेडे, विलास टेंभूर्णे, जयश्री जुमडे, शीतल गुरनुले, रेनुका घोडेस्वार आदींनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here