वाहनांची धडक बसल्या ने युवकाचा मृत्यू.
त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोटर मो.9096817953
उमरेड: मोबाईलवर बोलत असलेल्या एका तरुणाला भरधाव वेगाच्या वाहनाने धडक दिली. या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृत तरुणाचे नाव नंदकिशोर प्रभाकर दुधपचारे (वय ३२), रा. अभ्यंकर चौक, उमरेड असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री १२ वाजल्यानंतर मोहपा चौकात नंदकिशोर त्याची अॅक्टिव्हा (एमएच ४०/व्ही ९८२०) थांबवून फोनवर बोलत होता. दरम्यान,
विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका वाहनाच्या (MH 31/EA 7052 क्र.) चालकाने बेपर्वाईने आणि भरधाव वेगाने गाडी चालवली आणि चुकीच्या बाजूने जाऊन अॅक्टिव्हाला धडक दिली. या अपघातात नंदकिशोरचा जागीच मृत्यू झाला. मृताची बहीण उत्तरा दुधपचारे हिच्या तोंडी तक्रारीवरून उमरेड पोलिसांनी आरोपी चालक प्रणयसिंग बैस (वय 25) रा. कावरापेठ, उमरेड याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पीएसआय माणिक गुट्टे करत आहेत.