महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकारी निर्मला कुचिक यांचा चौकशी समितीला ठेंगा

महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकारी निर्मला कुचिक यांचा चौकशी समितीला ठेंगा
.
सीईओ राजिप यांनी नेमली होती चौकशी समिती.

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातील जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मबावि) निर्मला कुचिक यांच्या विरोधात झालेल्या तक्रारीच्या चौकशीसंदर्भात, चौकशी समितीने मागविलेली आवश्यक कागदपत्रे किंवा माहिती निर्मला कुचिक यांनी वेळेत सादर केलेली नाही, असे माहिती अधिकारामध्ये मिळालेल्या पत्रव्यवहारातून स्पष्ट झाले असल्याची माहिती तक्रारदार संजय सावंत यांनी दिली आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद नेहा भोसले यांना ईमेल करून या प्रकरणात फक्त मुख्य लेखा व वित अधिकारी रायगड जिल्हा परिषद यांनी सादर केलेला अहवाल ग्राहय धरण्यात येवू नये कारण मुख्य लेखा व वित अधिकारी रायगड जिल्हा परिषद हे खरेदी समितीमधील सदस्य असल्याने त्यांचा कल या प्रकरणाती अनियमीतता झाकण्याच्याकडे असल्याचा आरोप केला आहे. जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मबावि) निर्मला कुचिक यांच्या मु.का.अ. यांनी नेमलेल्या चौकशी समितीसमोर हजर न राहण्याची मुजोरी रेकॉडवर घेण्यांत यावी तसेच चौकशी समितीची पुन्हा स्थापना करून महिला व बालकल्याण विभागातील खरेदीशी संबधीत नसलेल्या अधिका-यांची नियुक्ती या समितीत करण्यांत अशी विनंती मुख्य कार्यकारी अधिकारी यांना केली आहे.
चौकशी समितीकडे माहिती आणि कागदपत्रे सादर न करण्याची नोंद
अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी निर्मला कुचीक, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मबावि) यांचे कडुन निविदा प्रक्रियेत पद व अधिकाराचा गैरवापर करून काही ठराविक लोकांच्या फायदयासाठी जाणीवपूर्वक ठेवल्या असल्याने या त्रुटी दुर करून पुन्हा नव्याने ई निविदा प्रसिध्द करणे तसेच वारंवार चुकीच्या ई-निविदा प्रसिध्द करणा-यांच्या गैरव्यवहाराबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करणे बाबत कुचिक यांच्या विरोधात दि. 12 मार्च 2025 रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दि. 19 मार्च 2025 च्या आदेशाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांची समिती नेमली होती.
चौकशी समितीला जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मबावि) निर्मला कुचीक यांचा ठेंगा.
या चौकशीसाठी, निर्मला कुचिक यांना चौकशी अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) यांनी त्यांच्या दि. 25 मार्च 2025 च्या पत्रान्वये 27 मार्च 2025 रोजी आवश्यक असलेली सर्व माहिती आणि कागदपत्रांसह समितीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले होते. त्यावेळी त्या उपस्थित राहील्या नाहीत. त्यानंतर चौकशी अधिकारी यांनी 2 जूलै 2025 च्या पत्राने दि. 4 जूलै पुर्वी तक्रारीच्या अनुषंगाने आवश्यक कागदपत्रे पाठवावीत असे कळविण्यात आले . वारंवार स्मरण करूनही संबंधित कागदपत्रे प्राप्त झालेली नसल्याने चौकशी अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) यांनी त्यांच्या दि. 9 जुलै 2025 च्या पत्रान्वये मुख्य कार्यकारीक अधिकारी रायगड जिल्हा परिषद यांना अहवाल सादर करून जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मबावि) निर्मला कुचिक यांनी तक्रारीच्या अनुषंगाने कोणतीही कागदपत्रे उपलब्ध करून दिलेली नाहीत तथापी मुख्य लेखा व वित अधिकारी रायगड जिल्हा परिषद यांनी अभिप्राय सादर केला आहे तो सीईओ यांना पाठविला असल्याचे नमुद केले आहे. तक्रारदार संजय सावंत यांनी मुख्य लेखा व वित अधिकारी रायगड जिल्हा परिषद यांनी सादर केलेल्या अभिप्रायाला हरकत घेतली आहे.