*बहिणीला त्रास देणाऱ्या जावयाला शेततळ्यात बुडवून केली हत्या.*
चंद्रपूर:- सतत बहिनीला त्रास होत होता. बहिन रोज रोज होण्या-या त्रासाला कंटाळली होती, तेव्हा बहिनीला सुरु असलेल्या त्रास बघून भावाने जावयाची हत्या केल्याची घटना चंद्रपुर जिल्हातील चिमूर येथे घडली.
चिमुर पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या कवडशी येथील अरुण नन्नावरे यांच्या शेत शिवाराच्या बोळीत १८ सप्टेंबरला दीपक नैताम यांचा मृतदेह तरंगताना शेतमालकास दिसला. चिमूर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मर्ग दाखल केला होता. घटनेचा सखोल तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश मोहोड यांनी त्यांच्या पथकासह केला. तपासात बहिणीला नेहमीच त्रास देण्याच्या कारणावरून मेव्हण्याने शेत बोळीत बुडवून जावयाला मारल्याचे उघड झाले. आरोपी रोशन सूर्यभान मेश्राम याच्या विरोधात गुन्हा नोंदवून पोलिसांनी ताब्यात घेतले.
चिमूर नगर परिषद क्षेत्रातील नेताजी वाॅर्ड येथील सूर्यभान मसराम यांचा जावई दीपक सरदार नैताम वय ३० वर्ष, रा. बामणी, ता. उमरेड हा १५ सप्टेंबरपासून बेपत्ता होता. कवडशी शेतशिवारातील अरुण नन्नावरे याच्या शेतातील विहीरीत १८ सप्टेंबरला दीपकचा मृतदेह तरंगताना आढळला. घटनेचा पंचनामा करून मृताची पत्नी अंकिता दीपक नैताम वय २१ वर्ष हिच्या तक्रारीवरून चिमूर पोलिसांनी मर्ग दाखल केला.
घटनेचा सखोल तपास करण्यात आला असता मृतक याला त्याचा मेव्हणा रोशन सूर्यभान मसराम हा बहिणीला त्रास देण्याच्या कारणावरून जीवे मारण्याची धमकी देत होता, अशी माहीती मिळाली. यावरून रोशन याची कसून विचारपूस केली असता, त्याने दीपकसोबत घटनेच्या दिवशी भांडण करून मृतास कवडसी शेत शिवारातील विहिरीत धक्का देऊन जिवाने ठार मारल्याचे तपासात निष्पन्न झाले.
चिमूर पोलिसांनी सुनंदा विजय नैताम (ता. बोथली, ता. उमरेड) यांच्या तक्रारीवरून मेव्हणा रोशन मसराम विरोधात गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उप-विभागीय पोलिस अधिकारी नीलेश पांडे, पोलिस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश मोहोड पथकातील कर्मचारी पोशी प्रमोद गुट्टे,सचिन गजभिये, सतीश झिलपे यांच्यासह करीत आहेत.