*महिला चालवत होती गांजा तस्करीचे नेटवर्क*
अमरावती प्रतिनिधि:- आज जिल्हात आणी ग्रामीण भागात गांजा तस्करीचे नेटवर्क खुले आम सुरु आहे. आणी ते नेटवर्क एक महिला तस्कर आपल्या साथीदारा बरोबर अनेक वर्षा पासुन चालवत असल्याची माहिती सूत्राकडून मीळाली आहे.
अमरावती ग्रामिण भागात गांजातस्करीचे नेटवर्क एक महिला चालवीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. महामार्गावरील एजंटच्या माध्यमातुन माल पुरवठा करण्याचा प्रयत्न करताना त्या महिलेसह दोन साथीदार अशा तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
6 लाख 96 हजार रुपयांचा गांजा, एमएच 27 बीए 3826 क्रमांकाची 30 हजारांची एक दुचाकी, 22 हजारांचा मोबाईल असा एकूण सात लाख 48 हजारांचा माल कारवाई करणाऱ्या पथकाने जप्त केला.
पोलिस अधीक्षक डॉ. हरिबालाजी एन यांच्या विशेष पथकाने तळेगाव दशासर ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली. आपल्या हद्दीतून गांजातस्करी सुरू असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळू नये याचेच आश्‍चर्य वाटते.
अरविंद आत्माराम मोहोड वय 55, रा. चांदुररेल्वे व सूरज अजय नगरडे वय 22, रा. धामक व सुलतानपूर येथील नंदा जाधव अशी अटक तिघांची नावे असल्याचे विशेष पथकाचे पोलिस निरीक्षक अजय आखरे यांनी सांगितले.
जप्त गांजा अटक तिघांना या पथकाने पुढील कारवाईसाठी तळेगाव दशासर पोलिसांच्या स्वाधीन केले. तेथेच तिघांविरुद्ध एनडीपीएस ऍक्‍ट अन्वये शनिवारी गुन्हा दाखल झाला. महामार्गालगत सुलतानपूर वरुन यवतमाळ, अमरावतीसह आसपासच्या जिल्ह्यातील एजंटजवळ सदर महिला गांजाचा पुरवठा करीत होती. महिलेविरुद्ध ओरिसा, कर्नाटकात गुन्हे
बाहेर राज्यामधुन गांजा आणून विदर्भातील काही जिल्ह्यात तस्करी होते. याप्रकरणात अटक महिलेस यापूर्वी वर्धा, ओरिसा, कर्नाटक येथे अटक झाली होती. असे सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय आखरे यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here