देवळीत गुन्हेगारांचा हैदोस

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
देवळी २८/०९/२१
देवळी परिसरात सोमवारी 27 रोजी घडलेल्या दोन वेगवेगळ्या मारहाणीच्या घटनेत दोन युवक जखमी झाले.एकाच दिवशी लागोपाठ घडलेल्या घटनांमुळे देवळीत भीतीचे वातावरण असून गुन्हेगारांवर देवळी पोलिसांचा धाक संपल्याचे दिसून येत आहे.दुपारी अडीच वाजता शिरपूर येथील पेट्रोल पंपवर वर्धा इतवारी परिसरातील काही गुंड पेट्रोल भरण्यासाठी आले.पेट्रोल भरण्यास उशीर होत असल्याच्या कारणावरून त्यांनी पंपावरील कर्मचाऱ्यांना घाण शिव्या देण्यास सुरवात केली. अगोदर पासून पेट्रोल भरण्यास सहकुटुंब उपस्थित असलेले 36 वर्षीय राजू वामन मोहिते रा.धानोरा (माली) ता. चांदूर रेल्वे यांनी वाईट शिवीगाळीवर आक्षेप घेत गुंडाना हटकले. त्याचा राग घेत गुंडानी मोहिते यांना बेदम मारहाण करून घटनास्थळावरून पळ काढला.
गंभीर जखमी मोहिते यांना इस्पितळात भरती करण्यात आले असून अज्ञात आरोपी विरुद्ध देवळी पोलीस स्टेशन मध्ये भादंवि 307 चा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपिंचा शोध सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांनी सांगितले. सोमवारी रात्री 9 वाजता घडलेल्या दुसऱ्या घटनेत देवळी येथील 18 वर्षीय सुरज घोडे या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर औद्योगिक परिसरातील एका ढाब्यावर तिघांनी संगनमत करून हल्ला केला आहे. व पुढेल तपास सुरू आहे.