एकतर्फी प्रेमातून एका महिलेला थेट किचनमध्ये डांबले*

46

*एकतर्फी प्रेमातून एका महिलेला थेट किचनमध्ये डांबले*

एकतर्फी प्रेमातून एका महिलेला थेट किचनमध्ये डांबले*
एकतर्फी प्रेमातून एका महिलेला थेट किचनमध्ये डांबले*

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953

नागपूर : सविस्तर वृत्त असे बहुजननामा एका युवकाने एकतर्फी प्रेमातून एका महिलेला थेट किचनमध्ये डांबून ठेवल्याची घटना समोर आली आहे.ही घटना नागपुर येथील कपिलनगर परिसरातील आहे. संशयित आरोपीने पिडित महिलेला विवाहासाठी मागणी घालत तिला तिच्याच घरातील किचनमध्ये डांबून ठेवलं. मुख्यता म्हणजे हे दोघेही विवाहीत असुन दोघाना प्रत्येकी 2 मुले आहेत. याप्रकरणी संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मोनू आडकिणे (रा. पडोळेनगर परिसर, नागपूर) असं अटक केलेल्याचं नाव आहे.
याबाबत माहिती अशी, मोनू आडकिणे हा विवाहित असून त्याला 2 मुलं आहेत. तो महापालिकेत कचरा संकलन आणि स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करतो. तर पीडित महिलाही विवाहित असून तिलाही 2 मुलं आहेत. एकेदिवशी पीडित महिला पतीची तब्येत बिघडल्यानंतर गडबडीत रुग्णालयाकडे जात होत्या. दरम्यान, रस्त्याच्या बाजूला कचरा गोळा कऱणाऱ्या मोनूचं तिच्याकडे लक्ष गेलं. त्यामुळे त्याने तिला थांबवून विचारपूस केली. दोघंही एकेकाळी शाळेतील वर्गमित्र असल्याने महिलेनं विश्वासानं त्याच्याशी संवाद साधला. यानंतर, आरोपीचं पीडितेच्या घरी जाणं येणं राहिलं.दरम्यान, काही दिवस असंच बोलणं सुरु राहिलं. मात्र नंतर आरोपी पीडित महिलेवर एकतर्फी प्रेम करु लागला. एकेदिवशी आरोपीनं पीडितेला तिच्या मुलांसमोरच विवाहाची मागणी केली. पण तिने स्पष्ट नकार दिला. या संतापातून आरोपीनं पीडितेला तिच्याच घरातील स्वयंपाकघरात डांबून ठेवलं होतं. याबाबत माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आरोपीला कपिलनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.