नेर बस स्थानकातील खड्डे बुजवा अन्यथा डेपोतून एकही बस सुट्टी देणार नाही.

56

✒ नेर तालुका प्रतिनिधी ✒

नेर:- नेर आगार परिसरात गेल्या अनेक महिन्यापासून पेट्रोल पंपाच्या कामासोबतच सौंदरीकरण्याचे काम संथ गतीने सुरु आहे. सतत येत असलेल्या पावसामुळे बस स्थानकावर मोठमोठे चिखलाचे डबके साचलेले आहे. या डबक्यातून अनेक बसेस ये जा करत असल्यामुळे त्या डव्यातील चिखल तेथे बाहेर गावी जाण्यासाठी उभे असलेल्या प्रवाशांच्या अगांवर व कपड्यांवर उडत असल्यामुळे प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. बस नेर स्थानक परिसरात जागो जागी मातीच माती टाकली असल्यामुळे त्या परिसरात चारही बाजूने चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.

बस स्थानकावर येणाऱ्या दोनचाकी वाहनधारकाला तर तारेवरची कसरत करून वाहन बस स्थानकावर आणावी लागत असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगार प्रमुख दिप्ती वडे यांना याबाबतचे निवेदन दिले. या निवेदनात असे म्हटलं आहे की, जर आठ दिवसामधे नेर बस स्थानकावरील चिखलाचा व खड्ड्यांचा बन्दोबस्त न झाल्यास आठ दिवसानंतर नेर आगारातुन एकही बस सुटू देणार नाही असा इशारा मनसे कडुन देण्यात आला.

निवेदन देतेवेळी मनसेचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब कठाळे, संजय काळे, सुरज वानखडे, प्रफुल गणोरकर, प्रवीण बावणे, अनुप ठाकरे व अन्य मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.