*राजुरा विधानसभा क्षेत्रांमधील विविध तालुक्यातील पुरुष व तरुणांचा युवा स्वाभिमान पक्षामध्ये प्रवेश*

कोरपणा तालुका प्रतिनिधी निखिल पिदूरकर 9067769906
सविस्तर वृत्त असे की युवा स्वाभिमान पार्टी चे जिल्हाध्यक्ष श्री.सूरजभाऊ ठाकरे यांच्या कार्याला प्रेरित होऊन आज दिनांक:- २८/०९/२०२१ ला युवा स्वाभिमान पार्टीच्या राजुरा येथील जनसंपर्क कार्यालयामध्ये विविध पक्षातील शेकडो पुरुष व तरुणांचा युवा स्वाभिमान पक्षात जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करण्यात आला… व त्याचबरोबर पक्षाची जुळलेल्या नवीन सदस्यांनी आपल्या तालुक्यातील व गावातील विविध समस्या जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांना सांगितल्या व जिल्हाध्यक्षांनी लवकरच सदर नागरिकांना समस्या मार्गी लावण्याचे सकारात्मक आश्वासन दिले. या वेळी प्रवेश करणारे मोहम्मद जाहिद, रशीद शेख, जाइर शेख, कादिर शेख, आयान कुरेशी, शुभम मुडले, अजय आईलवार, करण टेकाम, आकाश आईलवार, अतुल शेंडे, रूचीत उंबरे, संगम दुर्ग, दीपक गोरडवार, मारुती ईपावार, अंनि कोलगुरवार, अतुल जगताप आदींनी यावेळी युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी आल्वीन सावरकर, ऑस्टिन सावरकर, निखिल बजाईत, राहुल चौहान, अजवान टाक,भूपेश साठोने, जलाल बियाबानी आदी पदाधिकारी उपस्थित होते…