सावनेर बस स्टॅन्ड मधील बस येणे जाण्याच्या मार्गावर चेंबर चे झाकण फुटण्याच्या तयारीत. सावनेर आगार चा दुर्लक्षपणा

51

सावनेर बस स्टॅन्ड मधील बस येणे जाण्याच्या मार्गावर चेंबर चे झाकण फुटण्याच्या तयारीत.
सावनेर आगार चा दुर्लक्षपणा

सावनेर बस स्टॅन्ड मधील बस येणे जाण्याच्या मार्गावर चेंबर चे झाकण फुटण्याच्या तयारीत. सावनेर आगार चा दुर्लक्षपणा
सावनेर बस स्टॅन्ड मधील बस येणे जाण्याच्या मार्गावर चेंबर चे झाकण फुटण्याच्या तयारीत.
सावनेर आगार चा दुर्लक्षपणा

अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी-मो.नं-9822724136
सावनेर- 21सप्टेंबर2021
सावनेर येथील बस स्टँड चे नवीन इमारतीचे काम पूर्णपणे व्हायचे आहेत ते फारच कासव गतीने चालू आहे.त्यामुळे प्रवाशांना फार मोठा त्रास होत असून कोणत्या गावची बस कोणत्या प्लॅटफॉर्मवर लागते हेच कळत नाही.त्यामुळे नवीन बस स्टॅन्ड चे उद्घाटन केव्हा होते याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.तेथे सध्याचे प्रवाशांना बसण्याकरता टिनाचे शेड टाकून बस स्टॅन्ड बनवलेले आहे.तेथील आतील परिसरातील रोडवर बस ये जा च्या मार्गावर चेंबर चे झाकण फुटण्याच्या तयारीत असून,झाकण फुटल्यास दीड ते दोन फुटाचे चेंबर असल्याने फार मोठा हादसा घडू शकतो सावनेर आगार चेंबर चे झाकण फुटून फार मोठा हादसा होण्याची वाट बघत आहे का? बसची व छोट्या वाहनाची वर्दळ जास्त प्रमाणात असल्याने झाकण अर्ध्यापेक्षा जास्त प्रमाणात फुटलेले आहे.पूर्णपणे फुटण्यास काही वेळ लागणार नाही.त्यामुळे फार मोठा हादसा होण्यास नाकारता येत नाही.त्यामुळे आगार व्यवस्थापक यांनी चेंबर फुटून हादसा होण्याआधीच त्याची मरम्मत करावी.अशी मागणी बस स्टँड मधील प्रवासी करीत आहे.