शालेय शिक्षण विभागाचा प्रताप, कुराण हाती घेतलेल्या दहशतवाद्याचा फोटो छापला इतिहासाच्या पाठय़पुस्तकात.

✒प्रशांत जगताप, प्रतिनिधी✒
तेलंगणा:- तेलंगणा मधून एक खळबळजनक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. तेलंगणा राज्यातील शालेय अभ्यासक्रमात आठवीच्या इतिहासाच्या पाठय़पुस्तकात इस्लामिक कट्टरतावाद दाखविण्यासाठी एका हातात रॉकेट लॉन्चर तर दुस-या हातात कुराण असलेल्या दहशतवाद्याचा फोटो छापण्यात आला आहे. त्यामुळे तेलंगणात एकच गदारोळ माजला आहे. त्यांनतर सरकार ला छानपणा सुचला आणि सरकारने या फोटोसह छापण्यात आलेला मजकूर हटविण्याचे आदेश दिले.
आठवीच्या इंग्रजी माध्यमाच्या सामाजिक शास्त्र या विषयाच्या पुस्तकातील ‘प्रश्न बँके’त हा फोटो वापरण्यात आला आहे. या फोटोमुळे विद्यार्थ्यांसमोर चुकीची प्रतिमा तयार होत असल्याचे सांगत एसआयओ या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉ. तल्हा फैयाजुद्दीन यांनी या फोटोला तीव्र विरोध केला. याआधी हा फोटो ‘राष्ट्रीय आंदोलन-अंतिम चरण 1919-1947’ अध्यायात प्रकाशित करण्यात आला होता. शालेय अभ्यासक्रमात हा फोटो प्रकाशित केल्याप्रकरणी फैयाजुद्दीन यांनी प्रकाशकावर कारवाई करण्याची मागणी तेलंगणाच्या शिक्षणमंत्री पी.सबिता इंद्रा रेड्डी यांच्याकडे केली आहे.