सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी जोमात ! मोदी सरकारकडून महागाई भत्त्यात घसघशीत वाढ

सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी जोमात !
मोदी सरकारकडून महागाई भत्त्यात घसघशीत वाढ

सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी जोमात ! मोदी सरकारकडून महागाई भत्त्यात घसघशीत वाढ

🖋 अश्विन गोडबोले
📱 8830857351

महागाई भत्त्यासंदर्भातील निर्णयाची वाट पाहणाऱ्या लाखो सरकारी कर्चमाऱ्यांची प्रतिक्षा आज संपली. नवरात्रोत्सवादरम्यान सामान्यपणे महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळतो. मात्र हा भत्ता मिळण्याआधीच केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांवी वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे आता ३४ ऐवजी ३८ टक्के भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. केंद्र सरकारमधील ५० लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. तर ६२ लाखांहून अधिक पेन्शनधारकांनाही या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. महागाई भत्त्या हा कर्मचाऱ्यांच्या पगाराचा एक भाग आहे जो मूळ पगाराच्या विशिष्ट टक्केवारी म्हणून मोजला जातो जो नंतर मूळ पगारात जोडला जातो.
केंद्रातील मोदी सरकारने दसऱ्याच्या आधीच हा निर्णय घेतल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा याचा मोठा फायदा मिळणार आहे. हा भत्ता चार टक्के वाढल्याने पगारानुसार कोणाला किती फायदा होणार आहेत पाहूयात…

> जर मूळ वेतन/पेन्शन रुपये २५ हजार रुपये असेल, तर ३८ दराने डीए अथवा डीआर ९ हजार ५०० रुपये असेल. ३४ टक्के दराने, डीए अथवा डीआरची रक्कम ८ हजार ५०० रुपये असेल. याचाच थोडक्यात अर्थ असा की पगारामध्ये एक हजार रुपयांची वाढ होईल.

> जर मूळ वेतन/पेन्शन रुपये ३५ हजार रुपये असेल, तर ३८ दराने डीए अथवा डीआर १३ हजार ३०० रुपये असेल. ३४ टक्के दराने, डीए अथवा डीआरची रक्कम ११ हजार ९०० रुपये असेल. याचाच अर्थ असा की पगारामध्ये एक हजार ४०० रुपयांची वाढ होईल.

सरकारी कर्मचार्‍यांना साधारणपणे या वर्षाच्या उत्तरार्धात डीएमधील वाढ (सातव्या वेतन आयोगावर आधारित) घोषणेप्रमाणे प्राप्त होते. सामान्यपणे ही वेतनवाढ नवरात्रोत्सवाच्या आसपास मिळते. मार्चच्या सुरुवातीला, मंत्रिमंडळाने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता (डीए) आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता (डीआर) पूर्वी १ जानेवारी २०२२ च्या ३१ टक्क्यांवरून तीन टक्क्यांनी वाढवून ३४ टक्के केला होता. आता त्यात पुन्हा चार टक्क्यांची वाढ करण्यात आल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दसऱ्याआधीच दिवाळी आली असं म्हणता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here